
मतदान आल्यावर सगळे जातात पाहून,!!
दै.चालू वार्ता
उमापूर प्रतिनिधी
कृष्णा जाधव
गेवराई/उमापूर मधील तांडा वस्ती विकास कामे फक्त नावा पुरतेच आहे का..?असे प्रश्न येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला असून सदरील ग्रामसेवक व ग्रामपंचायत सरपंच यांचे लक्ष नाही का..!
या वस्तींमध्ये थोड्याच पावसामध्ये असे चिखल होते, व रस्त्याला गुडघ्या इतके पाणी साठवून राहते.की या रस्त्यावरून चालताही येत नसल्याने येथील वस्तीवरील नागरिक हैराण झाले असून, येथे पावसाळ्यात पालापाचोळ्यापासून दुर्गंधी उत्पन्न होते, नागरिकांच्या आरोग्यास हे अपायकारक असून सदरील ग्रामपंचायत ने हे खड्डे त्वरित बुजून घेण्याची मागणी येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
उमापूर फाटा वरील एकही रस्त्याचे काम ग्रामपंचायत ने अजून केले नसून, त्यांना विचारल्यास रस्ता मंजूर आहे फक्त असेच सांगून टाळाटाळ करतात, व रस्त्याबाबतीत नाल्याबाबतीत कोणतेच काम करत नसल्याने नागरिक हैराण झाले आहे,
उमापूर फाटा येथील नागरिकांतून असे सांगण्यात येते की घरपट्टी भरून नळपट्टी भरून आम्हाला नाल्या व रस्ते देखील करून देत नसल्याने नागरिक संतप्त आहे.
जास्त पाऊस झाल्यास रस्त्याला खूप चिखल सासून हे रस्ते चांलणे योग्य ही राहत नसल्याने यावर लवकर मुरूम टाकण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत उमापूर यांना वस्तितिल नागरिकांतून होत आहे…