
प्रतिनिधी मंठा सुरेश ज्ञा. दवणे मंठा
तालुक्यातील ग्रामीण भागातील पी.एम किसान योजनेचे हजारो लाभार्थी शेतकरी या योजनेपासून अद्याप पर्यंत वंचित राहिले असून अशा वंचित लाभधारकांना संबंधित महसूल व कृषी विभागामार्फत योग्य मार्गदर्शन होत नसल्याने हजारो लाभधारकांना योजनेचा लाभ मिळत नसल्याने आर्थिक नुकसान होत आहे. तर अनेक शेतकऱ्यांना कृषी व महसूल कार्यालयात हेलपाटे मारण्यात वेळ व पैसा घालावा लागत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी पी. एम किसान योजनेच्या लाभापासून वंचित आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना योग्य ते मार्गदर्शन लाभत नसुन ही योजना महसूल विभागाच्या दंडाधिकारी कृषी विभागाच्या यांच्या पासवर्ड खाली उघडली जाते. यावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाहील जाते. लाभधारक शेतकरयांनी ऑनलाईन केलेला नोंदणी अर्ज व शेतकऱ्यांची काही कागदपत्रे अपलोड करावी लागत आहे. परंतु शेतकऱ्यांनी कुठे काय करायचे हे माहीत नसल्याने कधी तहसील विभागात तर कधी कृषी कार्यालय मध्ये संगणक चालकांकडे वेळोवेळी खेटे मारुन नाहक त्राससहन करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परंतु अशा हजारो लाभधारक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन ही पुष्कळ कालावधी होऊन गेला असता तरीही या शेतकऱ्यांना मात्र पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नसल्याने अनेक शेतकरी तहसील व कृषी कार्यालयात खेटे मारत आहे. त्यामुळे अशा अनेक शेतकऱ्यांचा पैसा व वेळ वाया जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची होणारी हेळसांड थांबण्याची मागणी होत आहे.