
प्रतिनिधी अंबड
ज्ञानेश्वर साळुंके
सांगली-विटा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यांतील असणाऱ्या मगरुळ(चिंचणी) या गावात एक धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण खानापूर तालुक्यांसह विटा हादरला आहे. मुलीचे प्रेम-संबंध समजल्यांच्या रागाच्या भरांतून पोटच्या मुलीचा बापाकडूंन निर्गुण खून करुन बापाने मुलीचा अखेर शेवट केला. संतोष जगन्नाथ जाधव (वय ४५) असे या बापाचे नाव आहे. त्याच्यावर त्याच्याच मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत श्रेया संतोष जाधव ही केवळ सतरा वर्षाची होती तिचे प्रेम संबंध असल्यांच्या कारणांने चिडून जावुन घरातील भाजी कापण्यांचा चाकूने तिच्या डाव्या छातीवर भोसकला उपचारदरम्यान श्रेयाचा मृत्यू झाला पुढील तपास विटा पोलीस करीत आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून शेतकरी असलेला संतोष जाधव हा आपल्या पत्नी दोन मुली,मुलगा यांच्यासह मंगरुळ येथे वास्तवांस आहे. तर त्याची मुलगी श्रेया ही कार्वे विटा (खानापूर) येथील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. तिचे हे प्रेमसंबंध वडील संतोष याना मान्य नव्हते. त्या तरुणाशी बोलत जाऊ नकोस असे त्यांनी श्रेयाला अनेकवेळा बजावले होते. तरीदेखील श्रेया त्या तरुणांच्या नेहमीच संपर्कांत होती. शनिवारी सायंकाळी श्रेया घरात स्वयंपाक करत असताना वडील संतोष व आई तिला प्रेमसंबंध ठेवू नकोस तुझे अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर लग्न लावून देतो असे समजावून सांगत होते. मात्र श्रेया काहीही ऐकण्यांच्या मनस्थितीत नव्हती. त्यामुळे संतापलेल्या संतोष यांनी श्रेयांच्या छातीवर डाव्या बाजूला भाजी कापण्यांच्या चाकूने वार केले. या हल्ल्यात श्रेया गंभीर जखमी झाली तिला विटा रुग्णालयात उपचारांसाठी आणत असताना तिचा वाटेतच मृत्यू झाला. त्यानंतर वडील संतोष व तिच्या अन्य नातेवाईकांनी श्रेयांने आत्महत्या केल्याचा बनाव केला होता. मात्र पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना चांगलाच संशय येत होता. त्यांनी या प्रकरणाचा चांगलाच छडा लावला. आरोपी बापास ताब्यांत घेवुन सखोल चौकशी केली असता. आरोपी बापाने श्रेयाला चाकूने भोसकून ठार मारल्याची कबुली विटा पोलिसांना दिली. वडील संतोष जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांना अटक करण्यात आली आहे…