
वारकऱ्यांच्या वेशभूषाने पालक भारावले….
दै.चालु वार्ता
उस्माननगर प्रतिनिधी
लक्ष्मण कांबळे
नांदेड / शिराढोण :– उस्माननगर येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता.कंधार येथील
येथील किड्स क्लब पब्लिक इंग्लिश शाळेतील विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंगाच्या गजरात व भगव्या पताका हाती घेत विठु नामाचा गजर करीत ….. दिंडी सोहळा भक्तीमय वातावरणात शाळेत विठ्ठल नामाची शाळा भरली ! विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत पाहील्याने पालक भारावून गेले होते.
यावेळी बालगोपाळांनी वारकरी वेशभूषा परिधान केला होता. चौका चौकात , मुख्य रस्ता आदी ठिक ठिकाणी सद् भक्त मंडळींनी रिंगण सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. या दिंडी सोहळ्याने अवघा परिसर विठु नामाच्या भक्तीसागरात न्हावून निघाला होता.
ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम व विठ्ठल रुक्माई च्या जयघोषात आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मौजे शिराढोण येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडी व पालखी सोहळ्याने परिसर दुमदुमले होते.मुलींनी नऊवारी साडी व मुलांनी धोती खमिस हा पहेराव परिधान केला होता. गावक-यांनी आषाढी एकादशीचा होहळा पहावून वारकरी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी जनसमुदाय जमला होता .या दिंडीचे व पालखी सोहळ्याचे आयोजन किड्स क्लब इंग्लिश स्कूल चे संचालक संतोष संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका स्वाती संगेवार ,शिवानंद भुरे, तारा कपाळे, सुकेशनी पांडागळे , उमा महाजन, विजयमाला भुरे, बालाजी खंदारे, गजभारे, कविता हलकोडे,कांचन मारवाडे,पोर्णिमा इंगोले, वसुंधरा हातागळे,राणी देवणे व सर्व शिक्षक व सेवक यांनी या दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते.
सुरुवातीला पालखी मधील विठ्ठल रुक्माई च्या मूर्तींचे संचालक संतोष संगेवार, मुख्याध्यापक स्वाती संगेवार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी दिंडी व पालखीत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी रुपी वारकर्यांनी शिराढोण गावातून भव्य मिरवणूक रुपी दिंडीचे आयोजन केले. सुरुवातीला तबला धारक विद्यार्थी त्या नंतर तुळस डोक्यावर घेतलेल्या विद्यार्थिनी, भगवे ध्वजधारी विद्यार्थी, भगवा व कुर्ता धोती गणवेशातील वारकरी विद्यार्थी, नऊवारी घातलेल्या विद्यार्थिनी व इतर पारंपारिक गणवेशातील विद्यार्थी त्यांच्या सोबत सर्व शिक्षक वृंद व दिंडी मध्ये गायले जाणारे विठ्ठल रुक्माई, ज्ञानोबा तुकाराम च्या जयघोषात या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. हा दिंडी सोहळा बघण्यासाठी गावातील अबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती…