
भाजपा प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार यांचे येळी येथील जनसंवाद मेळाव्यात प्रतिपादन
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा : लोहा – कंधार मतदारसंघाचा विकास व सामान्य जनतेला मिळणाऱ्या सुविधा ह्या मतदारसंघात कोसो दुर असल्याची खंत भाजपा प्रदेश प्रवक्ते तथा लोहा कंधार मतदारसंघाचे भुमिपुञ तथा लोकप्रिय नेते एकनाथ दादा पवार यांनी कंधार तालुक्यातील येळी – हातनी येथील जनसंवाद मेळाव्यात व्यक्त केली .
लोहा – कंधार मतदारसंघात शेतकऱ्यांचे प्रश्न त्यामध्ये विज , शेतीसाठी मुबलक पाणीसाठा , मजुरांचा रोजमजुरीचा प्रश्न , गोर गरीब विद्यार्थ्यांनाचा शैक्षणिक प्रश्न व अडथळे , वयोवृद्ध महिलांचा अनाथ , निराधार , श्रावणबाळ योजनेसह अन्य योजनेचा खेळखंडोबा , अनेक विद्यार्थी शिक्षण शिक्षण घेऊन बेरोजगार आशा अनेक प्रश्नांनावर या जनसंवाद मेळाव्यात एकनाथ दादा पवार यांनी अनेक मुद्यांवर जनतेशी चर्चा केली.
लोहा – कंधार मतदारसंघात अनेक ठिकाणी खेडोपाडी नामांकित शैक्षणिक संस्था आहेत पण भरगच्च पैसे भरल्याशिवाय जनसामान्यांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही अनेक खेड्यापाड्यात रस्त्यांची बेअवस्था झाली असुन अनेक ठिकाणी गावात जाण्यासाठी पुलांची पण पडझड झालेली आहे. लोहा – कंधार मतदारसंघात शेतकऱ्यांना वेळवर विज , शहराकडे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ते नाहीत यासह अनेक मुद्यांवर भाजपा प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार यांनी कंधार तालुक्यातील येळी – हातनी येथील जनसंवाद मेळाव्यात भाजप प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार यांनी जनतेशी बोलताना संवाद साधला.
लोहा – कंधार मतदारसंघातुन पुणे येथे वास्तव्य गेलेल्या हजारो युवकांना रोजगार मिळवून दिला एवढेच नव्हे तर कंधार तालुक्यातील संत नामदेव महाराज संस्थान उमरज मध्ये देवस्थानचला विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून भरगच्च निधी उपलब्ध करून दिल्याने व मतदार संघात अनेक व्यक्तीला वैयक्तिक भेटून अडचणी दुर केल्याने लोहा कंधार मतदारसंघात भाजपा प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार यांच्या पाठीशी जनतेचा कौल प्रचंड प्रमाणात वाढला आहे. एवढेच नव्हे तर दिवसेंदिवस दिवस ग्रामीण सह शहरी भागात पण भाजपा प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार हा जनसामान्यांच्या नेता असल्याची प्रतिक्रिया जनसामान्यांच्या तोंडातुन लोहा कंधार मतदारसंघात ऐकावयास मिळत आहे .
कंधार तालुक्यातील येळी – हातणीमध्ये जनसंवाद मेळाव्यात हजारोंचा जनसमुदाय यामध्ये महिला , लहान बालके , जेष्ठ नागरिक , बेरोजगार युवकांना भाजपा प्रदेश प्रवक्ते तथा लोहा कंधार मतदारसंघाचे भुमिपुञ एकनाथ दादा पवार यांच्या मेळाव्याला उपस्थित होता.यावेळी मा जिल्हा परिषद सदस्य बालाजी भैया परदेशी तालुकाध्यक्ष ब्राह्मनंद सिरसाट, गंगाधर मैलारे , किशन टोणगे , विलास भरकडे, गंगाधर भरकडे,संदीप बेटकर, सह प्रचंड प्रमाणात परीसरातील जनसमुदाय उपस्थित होता…