
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा शहरातील इंदिरानगर भागातील रहिवासी असलेले गंगाधरराव बाबाराव भिसे सेवाजेष्ठता नियत वयोमानाप्रमाणे करनिरीक्षक प्रशासकीय सेवा नगरपालिका मुदखेड येथून दि.३०जून २०२३ रोजी प्रदीर्घ ३३ वर्षे २८ दिवस सेवा करून सेवानिवृत्त झाले. यांचा गौरव सोहळा आज दिनांक २ जुलै २०२३ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
गंगाधर बाबाराव भिसे यांनी दि.१ नोव्हेंबर १९९० पासून लिपिक पदावर सलग २३ वर्षे लोहा नगरपालिकेत आपली सेवा बजावली. कंधार नगरपालिकेत कर निरीक्षक पदावर चार वर्ष कार्यरत होते तर मुदखेड नगरपालिकेत ६ वर्षे २८ दिवस सेवेत असताना कार्यालयीन अधीक्षक, कर निरीक्षक, विद्युत विभाग, न्यायालयीन प्रकरणे, भांडारपाल, रमाई आवास योजना अशा पाच विभागाची जबाबदारी पणे पार पाडली. 30 जून २०२३ रोजी नियत वयोमनाप्रमाणे मुदखेड येथून ३३ वर्ष २८ दिवसाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सेवानिवृत्त झाले.यावेळी मुख्याधिकारी सचिन गाडे, दिलीप पवार रमेश सावंत गणेश वड्डे, मोहम्मद अजीम उल्ला यांचे सहकारी लाभले.
लोहा शहरातील इंदिरानगर भागात सेवानिवृत्ती गौरव सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर जी वाघमारे यांची प्रमुख उपस्थित होती. तसेच कंधार व मुदखेड येथील न.पा. कर्मचारी, लोहा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, प्रा.डाॅ, संजय बालाघाटे, नगरसेवक बबन निर्मले, मारोती,शेळके सय्यद गौस साहेब, महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना कोषाध्यक्ष वैजनाथ स्वामी, व्यंकट सेवनकर, विठ्ठल पारेकर, रमेश हातगळे (इवई) प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा संघटक, जेष्ठ साहित्यिक तथा ज्येष्ठ पत्रकार बापु गायकर, तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार,व्यंकट सेवनकर, विठ्ठल पारेकर,प्रा.पुरुषोत्तम बालाघाटे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण फुलवरे, बालाजी जाधव, प्रेमकुमार गड्डम,पत्रकार शिवराज दाढेल लोहेकर आदींनी शुभेच्छा दिल्या.