
अधिकाऱ्यांची अजब कारवाई
चोर सोडून संन्याशाला फाशी
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर शहर व परिसरात खुले आमपणे पान टपऱ्यावर किराणा दुकानांमध्ये गुटखा विक्री केली जात आहे. यावर निर्बंध घालण्यासाठी भेसळ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे; मात्र हे भेसळ अधिकारी हातावर पोट असणाऱ्या पानपट्टीवर कारवाई करून उर बडून घेण्याचा आव आणून गुटखा विक्रीतील बडे मासे सोडून किरकोळ पानपट्टीधारकांवर कारवाई म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी अशा सदरात मोडणाऱ्या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांत भेसळ अधिकाऱ्यांविरूद्ध संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.
महाराष्ट्र सरकारने २००४ मध्ये गुटखा निर्माण, उत्पादन व विक्रीवर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार सबंध महाराष्ट्रात गुटखा विक्री बंद झाली; मात्र गुटखामाफियांनी यातील पळवटा शोधून लगतच्या राज्यातील अर्थात तेलंगणा व आंध्रप्रदेशातून सीमेलगत बॉर्डरवरून संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना
व पोलीस प्रशासनाला हाताशी धरून येत आहेत. दिवसाढवळ्या खुलेआमपणे गुटखा तस्करीचा व्यवसाय तेजीत चालू केला आहे.
या गुटखा सेवन करण्याचे परिणाम किती हानिकारक आहेत, याची जाहिरात दूरदर्शन व अन्य मीडियावर दररोज दाखविली जात आहे; मात्र या जाहिरातीचा काहीही बोध न घेता तरुण पिढी दिवसागणिक व्यसनात बुडली जात आहेत. याचाच परिणाम कॅन्सर आजार हा अनेकांना ग्रासला आहे. अशा गुटखा खाण्याच्या व्यसनामुळे तरुण पिढीसह आम जनता देखील
व्यसनांच्या आहारी जात आहे. जर गुटखा, पान मसाले, तंबाखू अशा गोष्टींवर पूर्णपणे आळा बसविण्यासाठी भेसळ अधिकारी यांचे नियंत्रण अपेक्षित आहे; मात्र भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याने संबंधित विभागासह पोलीस प्रशासन देखील या गुटखा विक्रीच्या तस्करीकडे अर्थपूर्ण व्यवहारातून कानाडोळा करीत असल्याचे दिसून
यावर तालुका व जिल्हा पातळीवरील अधिकारी ‘हमाम मे सब नंगे’ आहेचा नारा देत आहेत. त्यामुळे ते कारवाईसाठी अॅक्शन मोडवर नाहीत. तरुण पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर आहेत किंवा कर्करोगासारख्या आजाराचा मोठा फायदा होत आहे. यावर अॅक्शन घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन हा गुटख्याचा गोरखधंदा बंद करावा, अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून व्यक्त केली जात आहे…