
प्रतिनिधी मंठा
सुरेश ज्ञा.दवणे मंठा
जय भीम सेनेच्या वतीने विविध मागण्या संदर्भात तहसीलदार, कार्यकारी अभियंता व पोलीस निरिक्षक यांना (ता. ३०) शुक्रवार रोजी निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि तालुक्यात शासाच्या नवीन नियमाने किंवा पूर्वीच्या नियमाने तात्काळ वाळूघाट सुरू करण्यात यावे, जवळपास २ महिने पूर्ण झाले आहे तरी देखील अद्यापही तहसील प्रशासनाकडून रेती वितरीत करणे बाबत उचित कार्यवाही करण्यात यावी. वाळू उपसा सुरू करून घरकुल धारकांना दिलासा द्यावा,
तसेच मंठा फाटा ते तळणी फाटा व मंठा फाटा ते दर्शना परिसरात गतीरोधक बसविण्यात यावे, व मंठ्या तालुकातील अवैधरीतीने अंधारातून सुरु असलेले अवैध धंदे कायम स्वरूपी बंद करून दोषी विरुद्ध कडक कार्यवाही करण्यात यावी.
करीता निवेदन देण्यात आले निवेदन देताना उद्धव सरोदे जयभीम सेना ता. अध्यक्ष मंठा, भिमराव वाघ जयभीम सेना जिल्हा उपाध्यक्ष जालना, मारोती कांबळे ता.उपाध्यक्ष मंठा, विलास बनसोडे कार्याध्यक्ष मंठा, पिराजी पवळे शहर अध्यक्ष मंठा, देविदास घुले उपशहर अध्यक्ष मंठा, भगवान हिवाळे ता. महासचिव मंठा, सिद्धार्थ देशमाने ता, युवक अध्यक्ष, महादेव घोड़े युवक महासचिव, पांडुरंग शिंदे ता. सचिव, प्रदीप कांबळे, ललित खरात, जावेद शेख जयभीम सेना कामगार ता. अध्यक्ष उपस्थिती होते.
मंठा, सुभाष भदरगे, सिद्धार्थ घुगे, रमेश आवारे, सुनील जाधव, बालेराज वाटूडे, अविनाश ढाकरगे, सुजित खनपटे, विजय खनपटे, दिपक गोंडगे, मुक्तार शेख, आबासाहेब गाडेकर, सतीश खंदारे, संतोष खरात, सुभाष मोरे, धुराजी कांबळे, दिपक जाधव, बहुसंख्य कार्यकर्ते..