
दै.चालु वार्ता लातूर जिल्हा प्रतिनिधी
राठोड रमेश पंडित
लातूर:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राळगा येथील दानशूर व्यक्तीमत्त्व गावचे भुमीपुत्र आदरणीय श्री राम जाविर यांनी शाळेच्या रंगरंगोटी व शालेय सुविधेसाठी भरभरून एक लक्ष पन्नास हजार रुपयाचा धनादेश शाळा व्यवस्थापनाकडे सुपूर्द केला दि.5 जुलै 2023 रोजी शाळेत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मणरावजी खांडेकर तर प्रमुख अतिथी म्हणुन खंडाळी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री मन्नान शेख साहेब,माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री बालाजीराव शिंदे साहेब, सांगवी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री भानुदासजी शिंदे साहेब, श्री अशोकराव नरवटे, जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री प्रकाश भालेराव आदी उपस्थित होते
मान्वरांच्या हस्ते दानशूर भुमिपुत्र पुणे येथील सुप्रसिद्ध काॅन्ट्रैक्टर आदरणीय राम जाविर( दादा) यांचा शाल, पुष्पहार,फेटा बांधुन यथोचित सन्मान करण्यात आला
जिल्हा परिषद शाळेतून संस्कारक्षम गुणवान भविष्यशातील आव्हाने पेलवणारी पिढी घडवण्याचे काम केले जात असल्याचे सांगितले
यावेळी बोलताना राम जावीर म्हणाले की,मी शिक्षणा अभावी स्वत: शाळेतील शिक्षण घेण्यापासून वंचित राहीलो असलो तरी माझ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळाले याकरिता शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री संजय पवार सर यांच्या शैक्षणिक कार्यातून प्रेरणा घेवून माझ्या गावातील विद्यार्थांना सोयी सुविधायुक्त शिक्षण मिळावे यासाठी रंगरंगोटीकरीता देणगी दिली असून मातृभूमीचे ऋण फोडणार असल्याचे मत व्यक्त केले
यावेळी शाळेचे गावातील नागरिक भिमराव नरवटे, संदेश नरवटे,भुजंग खांडेकर, दिगांबर चव्हाण, त्र्यंबक खांडेकर, माधव वडेर, दशरथ जावीर, मारोती जावीर, रमेश नरवटे, संतोष सुरनर, गोविंद जावीर, शिवाजी जावीर, माधव जावीर, हणमंत जावीर, अविनाश पवार, विनोद राठोड, रवी पवार, ज्ञानेश्वर खांडेकर, मारोती पवार
आदींची उपस्थिती होती
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय पवार, प्रास्ताविक मद्देवाड ए के, आभार प्रदर्शन गुळवे एस पी यांनी केले…