
गांभीर्य लक्षात घेऊन प्रश्न तात्काळ निकाली काढण्याचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुंडे यांचे आदेश…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :अंजनगाव सुर्जी न.प.कार्यालय जवळील नाली ब्लॉक झाल्यामुळे मानवाधिकार सहायता संघाचे कार्यकर्ते मुख्याधिकारी यांच्या दालनात धडकले.
सदर प्रकरण असे की,नगरपरिषद कार्यालय जवळच असलेली नाली मोठ्या नाल्याला काही वर्षांपूर्वी संलग्नित केलेली होती.परंतु मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या ये-जा करण्याचा रस्ता आणि त्यातल्या-त्यात न.प.कार्यालयातील घंटा गाडी,अग्निशमन गाडी तसेच मोठ्या प्रमाणात चारचाकी दुचाकी वाहनांच्या ये-जामुळे येथील छोटी नालीच जमीनदोस्त झाली.त्यामुळे त्या परिसरातील सर्व हॉटेलचे सांडपाणी व तेथे असलेले कृत्रिम प्रसाधन गृहाचे व्यवस्थापन त्याच नालीमध्ये असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा विचार लक्षात घेता मानवाधिकार सहायता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी प्रशांत उरकुंडे यांना निवेदन दिले.तसेच नागरिकासंबंधित शहरातील प्रलंबित असलेल्या कामांची पाहणी करून तात्काळ आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करून प्रश्न निकाली काढावे असे मानवाधिकार सहायता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चेतून मुख्याधिकारी यांना सांगितले.
मानवाधिकार सहायता संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेतून मुख्याधिकारी प्रशांत उरकुंडे यांनी नागरिकांच्या आरोग्याचा गांभीर्य लक्षात घेता सदर प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ निर्देश देऊन प्रश्न निकाली काढण्याचे आदेश दिले.
निवेदन देतेवेळी मानवाधिकार सहायता संघाचे प्रमुख सुनिल माकोडे,तालुका प्रमुख महेंद्र भगत,उपाध्यक्ष पंकज हिरुळकर,महासचिव सचिन इंगळे,श्रीकांत नाथे,श्रीकांत धुमाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते…
सदर ठिकाणी पशू वैद्यकीय रुग्णालय,आठवडी बाजार,मज्जिद,हॉटेल,व्यवसायिकांची दुकाने व महत्वाचे म्हणजे न.प.कार्यालय असे सार्वजनिक स्थळ आणि तेथील नागरिकांची असणारी मोठ्या प्रमाणात वर्दळ लक्षात घेता प्रशासनाने तात्काळ प्रकरणाची दखल घेऊन सदोष नाली बांधकाम करून नागरिकांच्या आरोग्याशी वेठीस धरणारा प्रश्न निकाली काढावा.
श्रीकांत नाथे
मानवाधिकार सहायता संघ