
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्या बद्दल भारतीय जनता पार्टी तर्फे देशभरात मोदी@9 महाजनसंपर्क अभियान निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली विधानसभा मतदार संघात दि. 03-7-2023 रोज सोमवार रोजी देगलुर बिलोली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील मौजे खानापूर या गावाला भारतीय जनता पार्टी च्यावतिने घर चलो अभियान हा कार्यक्रम 90-देगलूर – बिलोली विधानसभा निवडणूक प्रमुख माजी आमदार सुभाष साबणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन मार्गदर्शन केले. या वेळी भारतीय जनता पार्टी चे अनिल पाटील खानापूरकर व पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…