
७पोलीस निरीक्षक, ६ पोलीस उपनिरीक्षक आणि १३ सहायक पोलीस निरीक्षकांना बदलले…
दै.चालु वार्ता लातूर जिल्हा प्रतिनिधी
राठोड रमेश पंडित
लातूर:-गेल्या आठवड्यामध्ये राज्य सरकारने राज्यातील पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपपोलीस निरीक्षक यांच्या बदली आदेश काढले होते या आदेशामध्ये औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांची बदली नांदेड येथे झाले असल्याने औसा पोलीस निरीक्षक पद हे रिक्त होते. काल रात्री जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी पदोन्नती वर व जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या काही पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची जिल्हा अंतर्गत बदली आदेश काढले असून ते खालील प्रमाणे आहेत
औसा पोलीस निरीक्षक म्हणून सुनील हनमंतराव रेजीतवाड अहमदपूर पोलीस निरीक्षक सुधाकर देडे ,शिरूर आनंतपाळला विठ्ठल दराडे ,चाकूरला साहेबराव नरवाडे, देवणीला विष्णुकांत गुट्टे, रेणापूरला अशोक आनंत्रे यांची पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली असून त्याच बरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या देखील बदल्या केल्या आहेत त्या खालील प्रमाणे
असून यात औसा येतील सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले ज्ञानदेव सानप यांची गातेगाव पोलीस स्टेशन प्रभारी म्हणून बदली करण्यात आली असून बाळासाहेब नरवटे मुरुडला ,भीमराव गायकवाड वाढवणा, वाढवण्याचे पोलीस सहाय्य पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांची गांधी चौक ला ,औशाला राहुल कुमार भोळ ,विवेकानंद चौकला अशोक घारगे, एमआयडीसीला व्यंकटेश आलेवार , वाचक लातूर ग्रामीण श्रीमती दिपाली गीते ,वाचक पोलीस अधीक्षक लातूर विठ्ठलराव दूरपडे ,टीएमसीला श्रीमती क्रांती निर्मळ ,वाचक पोलीस अधीक्षक लातूर सुरज गायकवाड तर अहमदपूर ला पोलीस ठाण्याला सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून बालाजी तोटेवाड यांची बदली करण्यात आली आहे….