
दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद:-सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्हा परिषद प्रशाला भुम येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष विलास शाळू यांच्या सहकार्यातून वाटप करण्यात आले.आपली आजची येणारी पिढी ही खर्या अर्थाने भारताच भविष्य आहे.ग्रामीण भागात अर्थकारणामुळे अनेकांना आपलं शिक्षण अर्ध्यात थांबवावं लागत आहे.त्यातूनच अनेक ठिकाणी शिकण्यासाठी योग्य साधनांची पूर्ती नाही झाली की ते शिक्षण थांबवावं लागत आहे.अशाच काही मुद्द्यांवर लक्ष देत शैक्षणिक साहित्य वाटपाच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न करण्यात आला. यावेकी प्रशालेचे माजी मुख्याध्यापक बाबूजी सुकाळे ,भोनगिरीचे बाशाभाई शेख,विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोईज सय्यद यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक तात्या कांबळे होते.सूत्रसंचालन जोशी ए. टी यांनी केले.कार्यक्रमाला प्रशालेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.