
जनतेची राजकीय नेत्यांविषयी संतापाची लाट . .
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा.दवणे..
जालना….मंठा
सध्या चालु असलेल्या राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. जे विरोधक होते तेच येऊन सत्तेच्या पंगतीत बसले. राष्ट्रवादीतून काही आमदारांना घेऊन अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. राज्यातल्या सत्तानाट्याच्या या सगळ्या घडामोडीनंतर सगळी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. दुसरीकडे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडले आहेत. त्यामुळं ज्या जनतेनी मतदान केलं होतं, ते मतदान फुकट गेल्याची संतापाची लाट जनसामान्यातून येत आहे. मतदान केलं कोणाला आणि तो जातो कुठे? ही भावना सध्या राज्यात आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारण्याविषयी जनतेच्या मनात प्रचंड चीड आहे.
दरम्यान, आज मंठा येथे ‘एक सही संतापाची’ अभियान राबविण्यात आले. याला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या २.५ वर्षात जे पक्ष, आमदार फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे, महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल- झाला आहे. ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले, त्याच महाराष्ट्राची ही झालेली अवस्था पाहून मराठी माणसामध्ये राजकारणाबद्दल चीड निर्माण झाली आहे… याच रोषाला वाचा फोडण्यासाठी राज ठाकरेंनी ‘एक सही संतापाची’ हा उपक्रम राबवण्यास सर्व मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांना सांगितल आहे. त्यानुसार मंठा मनसेतर्फे आज एक सही संतापाची हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकाळी घेण्यात आला आला. .या उपक्रमाअंतर्गत हजारो नागरिकांनी आपली सही बॅनरवर करून आपला राग व्यक्त केला. मनसे जालना जिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत अनेक नागरिकांनी संतापाची सही करण्याबरोबरच सरकारबद्दल राग व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण यांनी उत्स्फूर्तपणे या मोहिमेत सहभाग घेवून या घाणेरड्या राजकारण्यांवर आपला राग व्यक्त केला. मनसे हा एकमेव राजकीय पक्ष आहे जो या चिखलाने बरबटलेला नाही, अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांनी दिली.तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी एवढी ढासळलेली असताना राज ठाकरे यांच्या हातात आता महाराष्ट्राची सत्ता दिली पाहिजे. अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया सुद्धा सामान्य नागरिकांनी दिली. मनसेच्या या उपक्रमात जिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळके, मंठा तालुकाध्यक्ष गणेश बोराडे, शहर अध्यक्ष गजानन माळकर,ता उपाध्यक्ष डॉ प्रल्हाद गडदे, बाळासाहेब देशमुख,शहर उपाध्यक्ष तुळशिराम बोराडे, टोम्पे आण्णा, बालासाहेब बोराडे,
श्याम दवणे, प्रल्हाद नाईक,
महादेव मिसाळ,केशव सावंत सुभाष झाकणे, वैजनाथ बोराडे, विकास बोराडे, सुर्दशन बोराडे,आदी सह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…