
दै.चालू वार्ता.
प्रतिनिधी,समाधान कळम वडोद तांगडा
पारध :पावसाळ्यात सोयबीन ,ज्वारीची पेरणी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी दिसत आहे. शेती करण्याकरिता खरी आवश्यकता आहे ती बैलाची.मात्र, बैलजोडीच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यातच त्यांच्या पालन पोषणाचाही खर्च झेपत नसल्याने अनेक शेतकरी बैलजोडी विकून भाडेतत्त्वावर शेतीची पेरणी ट्रक्टर पेरणी यंत्रने करीत आहेत. मात्र, ट्रेक्टरवर पेरलेल्या सोयबीनची उगवून येण्याची कमी शक्यता असते कारण दाने खोल किंवा जास्त प्रमाणात दाट पडतात .तसेच ट्रक्टर पेरणी यंत्राचं वजन जास्त असल्यास सोयाबीन बियानं मातीमोल वाया जात असते तालुक्यातील पारध वडोद तांगडा, शेलुद शिवारात शेतकऱ्याने बैलाजोडीच्या भरवशावर दहा एकर शेतीची नांगरणी व पेरणी केली. बैलजोडीवर पावसाळी काळात पेरणी करत असताना उत्पादन देखिल चांगलं घेता येते त्याकरिता त्याने परिसरात असलेल्या एका वेल्डिंग दुकांदाराकडून खास नांगर व पेरणी यंत्र तयार करून घेतले आहे. यामध्ये त्यांना कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून न जाता एका बैलावरही शेती करता येते ,त्यात खर्चाचा पण बचत होतो बियाणांची नासाडी होत नाहीत येणारे काळात बैलजोडी शिवाय पेरणी,चांगली होतच नाही बैलजोडीं महत्व काय आहेत हे शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.