
गोविंद पवार उपसंपादक नांदेड
लोहा : – धानोरा ( शेलगाव ) येथे शेतकऱ्यांना तुती लागवडीसह अन्य विषयांवर मार्गदर्शन संपन्न झाले.
धानोरा येथे शेतकऱ्यांना तुतीची लागवड कशा पद्धतीने करावी रोपे कशी असावीत ,त्यांचे संगोपन कसे करावे , व तयार झालेला तुतीचा माल कोणत्या मार्केटमध्ये विक्रीसाठी न्यावा व या व्यवसायस शासनाकडून काही आर्थिक मदत मिळते का , तर त्या योजनाचा लाभ कसा घ्यावा या विषयीचे सखोल मार्गदर्शन एन बी बावगे , जिल्हा रेशीम अधिकारी कुलकर्णी इंजिनिअर , पी टी ओ सह आदींचे मार्गदर्शन केले यावेळी धानोरा येथील शेतकरी गोविंद पा भुजबळ यांच्या शेतीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला धानोरा , शेलगाव , हिप्परगा , डोलारा , कारेगाव , हिप्परगा , जोमेगाव , धनज , वडेपुरी , सह आदी गावांचा समावेश होता. तर या कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल पाटील कदम ग्रामरोजगार सेवक संघटना लोहा यांनी केले होते .