
शहरात तुंबले पुराचे पाणी
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : अंजनगाव सुर्जी नगरपरिषद क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या मातंगपुरा-पानअटाई-शनिवारा-सराफा लाईन-तेलीपुरा या मार्गावरील पुराच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता नगरपरिषद प्रशासन अपयशी ठरत असल्यामुळे सदर परिसरातील नागरीकांमध्ये नगरपरिषद प्रशासनाप्रती असंतोष निर्माण झालेला दिसत आहे.
गेल्या बऱ्याच वर्षापासून मातंगपुरा-पानअटाई-शनिवारा-सराफालाईन-तेलीपुरा या मार्गावर पुराचे पाणी तुंबत आहे.त्यामुळे पादचाऱ्यांसह दुचाकी व चारचाकी वाहनांना सुद्धा हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीकोनातून त्रासदायक ठरत आहे.विशेषतः नगरपरिषद कार्यालय परिसरात सुद्धा समतोल परिस्थिती निर्माण झालेली आहे.
पुराचे पाणी तुंबल्याने ग्राहक पाठ फिरवीत असल्याने व्यावसायिकांचे फार मोठे नुकसान होत आहे.तर दुसरीकडे नागरिकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने आरोग्याविषयी प्रश्न केला जातोय.त्यामुळे आता पावसाळ्याच्या पर्वावर आपत्ती व्यवस्थापन संबंधित नागरिकांच्या सोयी-सुविधेचा विचार लक्षात घेता नवीन रुजू झालेले मुख्याधिकारी साहेब ॲक्शन मोड घेणार का? असा अपेक्षित प्रश्न नागरिकांकडून केल्या जात आहे..