
अनु.जमातीचे जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र विस्तारित क्षेत्रात ही सुलभतेने देण्यात यावे या प्रमुख मागणी.
दै. चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
मुंबई- आज दिनांक तीन जुलै रोजी दुपारी तीन वाजता मुंबई येथील राजभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय रमेश बैस यांच्या राजभवनातील दालनात कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील तसेच इतर संघटनांचे संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेण्यात आली.
या बैठकीत प्रामुख्याने आदिम विकास परिषदेचे अविनाश कोळी, आदिवासी कोळी जमात संस्थेचे प्राध्यापक शरण खानापुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत आमदार रमेश दादा पाटील यांनी महाराष्ट्रातील विस्तारित क्षेत्रातील आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार टोकरे कोळी डोंगर कोळी आधी जमातींना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देताना कशाप्रकारे भेदभाव केला जातो आणि सामाजिक आरक्षणापासून व इतर लाभापासून आदिवासी कोळी जमातीला कसे वंचित ठेवले जाते याची प्रस्तावना केली.
कोळी महासंघाचे युवा अध्यक्ष अडवोकेट चेतन पाटील यांनी कायदेशीर रित्या महाराष्ट्रातील तमाम भागातील न्यायालयामार्फत पडताळणी समिती वर ताशेरे ओढलेले आहेत आणि अवैध केल्यानंतर जे लोक न्यायालयात गेले त्यांना न्यायालयाने जात वैधता प्रमाणपत्र दिल्याचे अनेक उदाहरणे सांगून पडताळणी समितीच्या कार्यपद्धतीवर बंधने आणली पाहिजेत त्यांना आपल्या मार्फत व सरकारमार्फत मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्यास गोरगरीब जनतेला न्यायालयाच्या दरवाजापर्यंत जाण्याची आवश्यकता भासणार नाही याकडे माननीय राज्यपालांचे लक्ष वेधले.
प्रा. खानापुरे यांनी पुरावे दृष्टिक्षेपास आणून देऊन पुराव्याच्या बाबतीत टीएसपी आणि ओटीपी मध्ये कसा भेदभाव करून ओटीएसपी क्षेत्रातील साडेपाच टक्के आदिवासी जमातींना शासनाने न्याय हक्कापासून वंचित ठेवले आहे त्यावर आपल्या मार्फत निर्देश व्हावेत अशी विनंती माननीय राज्यपालांना केली.
माननीय राज्यपालांनी सर्वांचे मनोगत ऐकून श्रेष्ठ मंडळास आश्वासित केले की आपण दर्शविल्याप्रमाणे आदिवासी कोळी समाजावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी माझ्या वतीने आदिवासी मंत्री महोदय आदिवासी विकास विभागास निर्देशित करेल व विस्तृत बैठक घेऊन तुमचा प्रश्न कसा मार्गी लागेल याकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीत शिवशंकर फुले, सतीश धडे, मुकेश सोनवणे, गीतांजली कोळी, बाळासाहेब सैंदाणे, शंकर मनाळकर , माधव पूनवाड, राम सुरडकर ,धीरज संगाळे, दत्तात्रय सुरवसे आदी उपस्थित होते.