
दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी विशाल खुणे
दि 12 जुलै (नवी सांगवी पुणे )
नव्या सांगवीतील साई चौकातील रोहीत्रासह अनेक ठिकाणच्या रोहीत्राच्या संरक्षक कुंपण व तुटलेले दरवाजे अनेक वर्षांपासून तुटलेल्या आवस्थेत बदलणार कधी? -या मधळयाखाली आपल्या दैनिक चालू वार्ता मध्ये बातमी प्रसिद्ध झाली.
नव्या सांगवीतील साई चौकातील, श्रीनिवास सोसायटीच्या बाजूला रस्त्याच्या कडेला महावितरणने रोहित्र बसवले आहे, गेल्या तीन- चार वर्षापासून नागरिक रोहित्राला तुटलेले दरवाजे बसवण्याची मागणी नागरीक करत होते ,परंतु नागरिकांचा जीव गेल्यावरच महावितरणला जाग येईल का? असा संतप्त सवाल मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष
आण्णा जोगदंड यानी सांगवी येथील सहाय्यक अभियंता रत्नदिप काळे संतप्त सवाल निवेदन देतांना केला होता याची महावितरणने त्त्वरीत दखल घेऊन तुटलेल्या जाळ्या व दरवाजे नवीन बसवून त्यांना कडीकोंडे ही बसवले यामुळे आण्णा जोगदंड यांनी दैनिक चालू वार्ताचे आणि महाविरणने संवेदनशील विषय योग्य रितीने हाताळून होणारी दुर्घटना टाळल्यावददल महाविरणचे आभार मानले,आणि सामाजिक विषयांवर आपल्या दैनिक चालू वार्ताच्या माध्यमातून प्रश्न मांडल्याने दैनिक चालू वार्ताचे ही आभार मानले.
अशा संवेदनशील विषयावर नागरकांनी जागरूक असणे गरजे आहे असे मत जोगदंड यांनी व्यक्त केले.