
दैनिक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
देणाऱ्यांनी देत राहावे घेणाऱ्यांनी घेत राहावे घेता, घेता एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे या म्हणी प्रमाणे शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना सतत मदतीचा हात देणारे रायगड भूषण समाजसेवक श्री कृष्णा महाडिक साहेब यांच्या प्रयत्नातून जिजामाता मराठी माध्यमिक शाळा आगरवाडा या शाळेतील शिकणारे गरीब, गरजू विद्यार्थ्यांना श्री दिपक अग्रवाल मुंबई यांच्या कडून छत्र्या वाटप करण्यात आल्या, याच बरोबर शाळेचा माजी विद्यार्थी प्रितेश हरिचंद्र सावंत याच्या कडून हि शाळेला पंखा भेट देण्यात आला.
शाळेचे मुख्याद्यापक संदिप कांबळेकर, शिक्षक अंगद कांबळे, संदिप सुतार विद्यार्थी उपस्थित होते आभार मुख्याद्यापक संदिप कांबळेकर यांनी व्यक्त केले…