
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव… दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे.
जालना मंठा…. कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशाच्या लोकसंख्येवर अवलंबून असतो. एखाद्या देशाला पुढे आणि मागे ढकलण्यात लोकसंख्येचा मोठा वाटा असतो. संपूर्ण जगात ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने अनियंत्रित लोकसंख्या वाढीच्या मुद्दयावर लक्ष केंद्रित केले जाते आणि त्यावर विचारविनीमय केला जातो त्या अनुसंघाने मंठा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांच्यावतीने लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला आहे. सन २०२२-२०२३ मध्ये राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमामध्ये स्त्री नसंबदी शस्त्रक्रिया मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे आरोग्य कर्मचारी आरोग्य संस्था आरोग्य अधिकारी आशा स्वयंसेविका यांचा प्रमानपत्र देऊन गौरव करण्यात आला यामध्ये स्त्री नंसबंदी शस्त्रक्रिया तालुक्यातून आरोग्य सेवकामधून प्रथम क्रमांक ढोकसाळ आरोग्य केंद्राचे सुजीत वाघमारे, द्वितीय संजय बुधवंत तृतीय अशोक जावळे यांना देण्यात आला तर आरोग्य सेविकामधून प्रथम तळणी आरोग्य केंद्राच्या रजीता राठोड, द्वितीय क्रमांक पाटोदा शिल्पा चव्हाण,तृतीय क्रमांक पाटोदा आशा घंनसांवत यांना मिळाला आहे तर तांबी मध्ये पाटोदा चे आरोग्य सहाय्यका डी व्ही गायकवाड तर आशा स्वयंसेविका मध्ये पाटोदा चे छाया बोराडे यांना मिळाला आहे. संस्था मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र ढोकसाळ तळणी व ग्रामीण रुग्णालय मंठा ला मिळाला आहे तसेच उल्लेखनीय कामगिरी करणारे आरोग्य कर्मचारी रणजित देशमुख, बबीता केसकर,उर्मिला कुटे,प्रविण शेवाळे,चंद्रकला पोपटे,निता राठोड ,शिला गणकवार, अरुण राठोड, राहुल हनवते,सचिन वैराळ, अस्लम बागवान यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे महणुन डॉ. राजेंद्र गायके तर अध्यक्ष म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ सचिन शेकडे होते यावेळी विलास देशमुख, अशोक अंभुरे, जावेद पाशा अन्सारी, कुसुम बुधवंत,लता मुरमरे,साजेद शेख, तौफीक शेखसह इत्यादी उपस्थिती होते…