
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर शहरामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री अष्टावधानी नेतृत्व
देवेंद्र फडणवीस
यांच्या वाढदिवसा निमित्त मागील 3 वर्षापासून आरोग्य शिबीर घेण्यात येत आहे ज्यात 250 लोकांचे मोतीबिंदू ऑपरेशन, विविध आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर,कोरोना काळात संपूर्ण देगलूर शहर सॅनिटायझेशन , मास्क वाटप अशे विविध कार्यक्रम घेण्यात आले दर वर्षी प्रमाणे दिनांक 22 जुलै शनिवार रोजी नागरेश्वर मंदिर येथे सकाळी:- 10 ते सायंकाळी :- 5 या वेळेत
मोफत आरोग्य शिबीर
सुवर्ण कमलदल वर्ष 4 थे आयोजन करण्यात आले आहे. पुढील मोफत आरोग्य सुविधा देण्यात येतील.
1) मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर
2) मोफत आरोग्य तपासणी
3) मोफत स्त्री रोग निदान
4) मोफत दुर्बीण द्वारे कुटुंब नियोजन शस्त्र क्रिया
(Family Planning)
5) मोफत लेजर द्वारे पाईल्स (मूळव्याध) शस्त्रक्रिया
6) मोफत हाडांचे सर्व रोग निदान
7) रक्तदान शिबीर
8) त्वचारोग उपचार
9) दंत रोग उपचार
याचा सर्व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी देगलूर च्या वतीने करण्यात येत आहे.