
दै.चालु वार्ता
चाकूर तालुका प्रतिनिधी किशन वडारे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव वाघ यांचा वाढदिवस हणमंतवाडी येथील संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी श्री उत्तमराव वाघ यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक विश्वनाथजी एडके यांनी केले.
याप्रसंगी चाकूर तालुक्यातील विविध भागातील पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उत्तमराव वाघ यांचा वाढदिवस केक कापून करण्यात आला.
यावेळी कलकोटी, बोथी, शेळगाव, मांडुरकी, तीर्थवाडी, चापोली, रोहिणा, उजळंब, चाकूर येथील कार्यकर्त्यांनी उत्तमराव वाघ यांना वाढदिवसानिमित्त केक कापून शुभेच्छा दिल्या.
हणमतंवाडीचे सरपंच हणमंतराव नरवटे यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी विविध भागातील कार्यकर्ते,पदाधिकारी यांच्यासाठी अल्पोहाराचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादीचे नेते गंगाधरप्पा अक्कानवरु,गणपतराव नितळे,कलकोटीचे सरपंच परमेश्वर कांबळे, प्रहार तालुकाध्यक्ष वर्धमान कांबळे,
नेवाळे चंद्रकांत, बाबुराव पाटील,समाधान कांबळे,संजय काळवने,रामदास कांबळे,गिरधारी, काबळे, पञकार माधव वाघ,भोसले ज्ञानेश्वर,रुपेश वाघ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.