
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर: नेहमी चर्चेत असलेले देगलूर चे आगार प्रमुख अमर पाटील यांची बदली करण्यात आली कर्मचाऱ्यांना भेदभावपूर्ण वागणूक, प्रशासनावरील सैल पकड, आगार व्यवस्थेकडे दुर्लक्ष, प्रवासी सेवेकडे दुर्लक्ष करणारे निष्क्रिय आगारप्रमुख अमर पाटील यांची अखेर देगलूर येथून अहमदपूर आगारात बदली करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या स्वाक्षरीने ११ जुलै रोजी काढण्यात आलेल्या आदेशानुसार अमर पाटील यांची देगलूर आगारातून अहमदपूर जिल्हा लातूर येथील आगारात आगार व्यवस्थापक म्हणून बदली करण्यात आली आहे. ही बदली विनंती अर्जावरून केली असल्याचा आदेशात उल्लेख असला तरी वास्तवात अमर पाटलांच्या निष्क्रीय कारभारामुळे ही बदली झाल्याचे बोलले जात आहे. अमर पाटील यांच्या कार्यकाळात देगलूर आगाराची पुर्णपणे दुरावस्था झाली आहे. देगलूरहून नांदेड, हैद्राबाद, पुणे, नागपूर, लांब पल्ल्याच्या गाड्यांची योग्य तपासणी, दुरुस्ती करण्यात येत नसल्यामुळे अनेक वेळा बसगाड्या रस्त्यातच बंदपडत असत. देगलूर – नांदेड मार्गावरील मोठ्या संख्येने असलेल्या प्रवाशांना ‘कॅश’ करण्यासाठी लागणारी योजना, यंत्रसामग्री, बसगाड्या देगलूर आगारात नसल्यामुळे खाजगी बस वाहतूक मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. प्रवाशांना तिकीट देण्यासाठी लागणाऱ्या तिकीट मशीन मोठ्या संख्येने नादुरुस्त झाल्यामुळे नांदेडहून परिवहन आलेल्या वाहकाकडील तिकीट मशीन घेऊनच देगलूर गाडी निघत असे. नवीन बस आगारासमोर साचलेले पाण्याचे तळे, संरक्षक भिंतीचा सार्वजनिक मुतारी सारखा होणारा वापर, बसस्थानकातील अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा अभाव, जुन्या बसस्थानकासमोर झालेले खड्डे, साचलेले पाणी, विद्युत पुरवठा, पंखे, निवाऱ्याचा योग्य बैठक व्यवस्थेचा अभाव, कर्मचाऱ्यांची सकाळी पाच ते रात्री दहापर्यंत स्थानकात ड्युटी नसणे व स्थानकासमोरील पानटपरी, हॉटेलवाल्यांचे अतिक्रमण, संरक्षक भिंतीवरून होणारा मांस विक्रीचा व्यवसाय बसस्थानकात शौचालयाचा, स्वच्छतेचा अभाव, कर्मचाऱ्यांवरील नियंत्रणाचा अभाव आदी कारणांमुळे प्रवासी सुविधा पार रसातळाला पोहोचली होती.
आता तरी देगलूर लोकप्रतिनिधींनी पुढील आगार प्रमुख कर्तव्यदक्ष व कार्यक्षम असा अधिकारी देगलूर आगारांमध्ये आणावा अशी देगलूर तालुक्यातील नागरिकांमध्ये बोलले जाते…