
जळकी बाजार ते वडोद तांगडा झाला चिखलमय…
दैनिक चालु वार्ता ने घेतलीय रस्त्याची रोखठोक दखल प्रतिनिधी समाधान कृष्णा कळम…
दैनिक चालू वार्ता .
प्रतिनिधी समाधान कृष्णा कळम.
भोकरदन : तालुक्यातील वडोद तांगडा ते जळकी बाजार हा रस्ता सध्या चिखलमय झाल्याचे दिसून येत आहेत. तसेच त्या मार्गी सुलतानपुरा ,नरसोबाची वाडी येथून लहान मुलांना दररोज शाळेत जात असताना चिखल तुडवून जावे लागत आहेत . सतत चिखलमय रस्त्याने प्रवास करत असताना त्या रस्त्याचा खुप कंटाळा विद्यार्थ्यांना आला आहेत. त्या वाड्यांवस्तीवर शाळेत मुलीची सर्वांत जास्त संख्या आहे,, असं म्हणतात की, मुलगी शिकली प्रगती झाली, पण आमची व या वडोद तांगडा ते जळकी बाजार रस्त्याची प्रगती होईल का नाहीत . योग्य ते शिक्षण घेता येईल का नाहीत ही शंका शाळेतील रस्त्याने येजाय करणारी विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहेत.
सदरील या रस्त्याचा कधी मुहुर्त निघेल यांची आम्हाला चिंता आहेत .तसेच रस्त्याची अवस्था तर बेकारच हाय त्याहूनही बिकट परिस्थिती तर रत्यावरील पुलाची आहेत . पालकांना आपला पाल्य शाळेत गेला असता , कधी घरी येईल व कधी कसा शाळेत जाईल अथवा यात आपल्या मुलामुलींचे बरं वाईट होईल का हि चिंताजनक भीती निर्माण झाली आहेत.
खड्डयांनी रस्तेच व्यापले !
सुलतानपुरा वस्ती येथील नागरिकांना वीस वर्षांपासून रहदारीसाठी डांबरी रस्ताच नाही. परिणामी शाळेसाठी विद्यार्थ्यांना आजही चिखल तुडवत यावे लागत आहे.
सरकारच्या वतीने सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून शाळांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शंभरवर शाळांना आयएसओ मानांकनदेखील मिळाले; मात्र,वडोद तांगडा येथिल सुलतानपुरा हद्दीतील वस्ती येथील जिल्हा परिषद प्रथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या रस्त्यांसाठीचा वनवास संपता संपेना. रस्त्याची अवस्था बिकट असून, विद्यार्थ्यांना सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसांत अक्षरशः दोन फूट खड्ड्याच्या रस्त्यातून चिखलातून वाट काढत शाळेत जावे लागत आहे, रस्ता पाऊस पडल्यानंतर खराब होत असल्यामुळे परिसरातील नागरिक, शाळकरी मुले, मुली यांना वडोद तांगडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत येणे अवघड होऊन बसते. ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना आश्वासन देणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनासुद्धा लक्ष देण्यास वेळ नाही, याबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हा रस्ता म्हणजे सिल्लोड भोकरदन या 2 तालुक्यातला जोडला जाणारा शॉटकट मार्ग आहे, मात्र या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटलेला असतो.यामुळे जळकी बाजार येथिल ग्रामस्थांना रहदारी करण्यासाठी 20 किलोमीटर अंतर पार करून गाव गाठावे लागत आहे.या रस्त्याने जर गेले तर वडोद तांगडा ते जळकी या दोन्ही गावाचे अंतर 4 किलोमीटर आहे .मात्र पावसाळ्यामध्ये या रस्त्याची ,व पुलाची उंची कमी असल्याने त्यावर वेगाने पाणी प्रवाह वाहत असल्यामुळे पुलावरून साधे चालल्या सुद्धा जात नसल्यामुळे गरजु ग्रामस्थांना 20 किलोमीटरचे अंतर पार करून गाव गाठावे लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करुन वेळच या पुलांचे मोरीपुल बांधकाम रस्त्यांचे पूर्ण डांबरीकरण करावं अशी मागणी सध्या गावकरी करीत आहेत.