दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी मंठा/सुरेश ज्ञा.दवणे
जालना. मंठा..शाळेतील शिक्षकांची रिक्त पदांची अडचण दूर करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने मानधन तत्त्वावर सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे डीएड, बीएडधारक तरुणांमध्ये संताप निर्माण झाला आहे. आधीच भरती बंद असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच शासनाने हा निर्णय घेतल्याने संतप्त झालेल्या बीएड, डीएड पदवीधारक विद्यार्थ्यांनी आता आम्ही पदव्या विकायच्या काय, असा सवाल शासनाला केला आहे.
ज्या सेवानिवृत्ती व पेन्शनधारकांना विश्रांतीची गरज आहे. त्यांना शासन आता २० हजार रुपये मानधनावर शिक्षक म्हणून सेवेत घेणार आहे. नवीन शिक्षकांची भरती टाळण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे.
तर विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, ही या मागे चांगली भावना असली तरी यामुळे शिक्षक पदासाठी पात्र असलेल्या डीएड, बीएडधारक उमेदवारांवर हा अन्याय असल्याचे या उमेदवारांनी म्हटले आहे…रिक्त जागांसाठी तरुणांना संधी द्या…
अनेक जिल्हा परिषद, शासकीय निवासी शाळा, शासकीय व खासगी आदिवासी आश्रमशाळा. वस्ती शाळा या शाळांमध्ये अनेक विषयांच्या शिक्षकांची गरज आहे. अशावेळी उत्साही, उपक्रमशील शिक्षित, शैक्षणिक पात्रता व व्यावसायिक अर्हताधारक तरुणांना शासनाने संधी द्यावी, अशी मागणी केली जात आहे… मी डीएड, पदवीधारक आहे; पण सरकारच्या धोरणामुळे मला तासिका तत्त्वावरही कोणी घ्यायला तयार नाही, त्यामुळे मी ही पदवी घेऊन चूक केली काय, असा प्रश्न मला पडला आहे.
-सुरेश मस्के दहिफळकर…
शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे.
सेवानिवृत्तीधारकांना पुन्हा सेवेत घेऊन शासन सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर अन्याय करीत आहे.
संदीप गडधे वडगावकर…