
पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची आर्थिक मदत..
गोविंद पवार उपसंपादक नांदेड
लोहा तालुक्यातील रिसनगाव येथील अल्पभूधारक शेतकरी मुक्ताजी रामा हाबगुंडे यांनी चार दिवसांपूर्वी सततची नापिकी व दुबार पेरणीचे संकट, कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाची पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश सचिव मोतीराम पाटील पवार यांनी भेट दिली व आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे यावेळी सांत्वन करून त्या कुटुंबाला अत्यावश्यक शेतीसाठी लागणारे बि – बियाणे भेट देऊन कुटुंबाला दुःखातुन सावरण्यासाठी धीर दिला.
यावेळी सरपंच पिंटु पाटील पवार , मा. सरपंच माधव तागोटे , पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे कृषी परिषदेचे प्रदेश सचिव मोतीराम पा पवार , मोतीराम कापसे , हनुमंत पवार , विलास पवार , निवृती तागोटे सह आदिंची उपस्थिती होती.