
गोविंद पवार उपसंपादक नांदेड
लोहा तालुक्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी सध्याच्या स्थितीला चळवळीत असणारे मन्याड फाउंडेशन या फाउंडेशने शेतकऱ्यांचा पिकविमा ऑनलाईन मोफत भरायला चालु करताच दोन दिवसांनी प्रशासनाला जाग आली असल्याची प्रतिक्रिया मन्याड सुर्योदय फाउंडेशनचे युवक तालुकाध्यक्ष गजानन पाटील मोरे यांनी दिली आहे .
सध्या खरीप पिकविमा भरायला सुरुवात झाली असून यावर्षी शेतकऱ्यांना फक्त १ रूपये विमा भरायचा असुन ऑनलाईनसाठी शेतकऱ्यांकडून शंभर रूपये केंद्र चालक घेत असल्याने कंधार लोहा तालुक्यात मन्याड सुर्योदय फाउंडेशनने पिकविमा मोफत भरायला सुरुवात करताच व मोफत पिकाविमा भरायचे बॅनर तहसील कार्यालयासह शहरात अन्य ठिकाणी लावलेले पाहुन प्रशासनाला जाग आली असल्याची प्रतिक्रिया मन्याड सुर्योदय फाउंडेशनचे युवक तालुकाध्यक्ष गजानन पाटील मोरे यांनी दिली.
लोह्याचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वीच प्रसार माध्यमांना पिकविमा मोफत भरल्या जाणार असुन जर कोणी ऑनलाइन करण्याचे पैसे मागितले तर त्या केंद्र चालकांचा परवाना रद्द करणार असल्याची माहिती दिली आहे.
यापुढे शेतकऱ्यांना पिकविमा भरण्यासाठी केंद्र चालकांनी पैसे मागितल्यास तहसील कार्यालय लोहा व मन्याड सुर्योदय फाउंडेशनच्या कार्यकत्यांशी संपर्क साधावा अशी माहिती मन्याड सुर्योदय फाउंडेशनचे युवक तालुकाध्यक्ष गजानन पाटील मोरे यांनी दिली.