
दैनिक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी -अंगद कांबळे
खरसई दि. १४ जुलै २०२३ -म्हसळा येथील खरसई या शाळेने विद्यार्थ्यांची वर्षा सहल आयोजित केली होती. यावेळी गावापासून काही अंतरावर गावाच्या नजिक
शेताच्या बांधावर जाऊन जिल्हा परिषदेच्या शाळेमधील विद्यार्थानी भात शेतीची ओळख करून घेतली. भात खणनी , भात लावणी , व इतर मशागत बाबत माहिती घेतली यावेळी आदर्श शेतकरी जनार्दन खोत, दत्ताराम पयेर, उत्तम शितकर यांनी सविस्तर माहिती दिली
व प्रत्यक्ष वर्षा सहलीच्या माध्यमातून भेट दिली असता . तसेच प्रत्यक्ष अनुभव घेऊन सहशालेय उपक्रमातून म्हसळा तालुक्यातील खरसई मराठी शाळेत भाताच्या शेतीला भेट देऊन विद्यार्थ्यांना याबाबत माहिती व्हावी म्हणून शाळेने हा उपक्रम राबवल्याचे मुख्याध्यापक शारदा शामराव कोळसे व जयसिंग बेटकर यांनी सांगितले भात शेतीस प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांना विविध प्रश्न विचारत आपल्या शंकांचे निरसन केले . अनौपचारिक शिक्षणातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती मिळाली . भाताची लागवड कशी करतात , पिकांची रोपे कुठे तयार करतात , लागवड संपूर्ण शेतातच का करतात ? वाफे पद्धत, भाताला पाणी किती द्यावे लागते , ह्या पिकाला कशी जमीन लागते , उत्पन्न किती मिळते , पीक काढणीनंतर भात कसा तयार करतात , इतर प्रश्नांची विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भाताच्या पिकास भेट देत माहिती जाणून घेतली . शेतकरी जनार्दन खोत यांनी विद्यार्थ्यांना प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन विद्यार्थ्यांना प्रश्नांना निरसन केले. मुलांनी केल्याच्या नदीवरील प्रकल्पास भेट दिली. यावेळी उपक्रमशील शिक्षक शेबांळे सर यांनी विद्यार्थ्याच्या प्रश्नांची उत्तरे दिले. या भागातील नैसर्गिक परिसर तसेच जंगल्याची , त्यातील वनस्पतीची नावे जाणून घेतली . शिक्षक राम थोरात , शिक्षण प्रेमी अजय पयेर यांनी वर्षा सहल नियोजनासाठी अथक प्रयत्न केले…