
चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी
संतोष मनधरणे
देगलूर : खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली येथील २७ विभागाच्या उपस्थितीत जनता दरबारास सुरुवात झाली. यावेळी देगलूर शहरातील नगर परिषदेच्या ढिसाळ कामाची तक्रार खासदारांच्या कानी पडताच त्यांनी संतप्त होऊन जिल्हाधिकारी नेतृत्वाखाली एक समिती गठीत करून नगर परिषद देगलूरची सखोल चौकशी करण्यासाठी आदेशित केले…
यांच्या
दरम्यान, देगलूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी या जनता दरबारात उपस्थित नव्हते. तेव्हा खासदारांनी मुख्याधिकाऱ्याविषयी खोचक बोलत नातेवाईक आजारी आहे का? जनता दरबार असल्यामुळे आजारी पडले याचीही चौकशी करण्यात यावी असे सांगितले.
देगलूर नगर परिषदेने तर्फे ‘भुयारी गटारी योजना ही रखडलेली आहे. गेल्या पाच वर्षापासून या कामाचे कोणतेच असे नियोजन व सुरुवात झालेली नाही. हे काम असल्याचे दिसते. गेल्या पाच वर्षापासून रेंगाळले आहे शिवाय या कामाबद्दल नेहमीच वाद निर्माण झालेला दिसून येतो. कामाच्या सुरुवातीस दोन वेळेस याचे उद्घाटन झाले होते. तद्नंतर नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार यांच्या कार्यकाळात या कामास पुन्हा सुरुवात होऊन जवळपास ३०० कोटीच्या वर निधी पुन्हा उपलब्ध करून देण्यात आला होता. परंतु या रखडलेल्या कामाविषयी जनतेने प्रश्न निर्माण केल्यामुळे खासदार अत्यंत उद्विग्न होऊन नगर परिषदेच्या सर्व कामाची व आलेल्या निधीची सखोल चौकशी करावी असे आयुक्तांना दूरध्वनीवरून आदेशित केले. त्यामुळे येणाऱ्या काळात नगरपरिषदेची चौकशी झाल्यास तत्कालीन नगराध्यक्ष यांची चांगलीच गोची होणार
याशिवाय शहरातील अनेक रस्ते, नाल्या या दोन-तीन वर्षात पुनःपुन्हा निर्माण करण्यात आले आहेत. शहरात पाणी पुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे.
त्यामुळे तत्कालिन मुख्याधिकारी आणि येथील ठेकेदारांचे किती आतले संबंध आहेत आणि त्यांची टक्केवारीची भाषा किती प्रखर आहे हे प्रामुख्याने जाणवल्या मुळेच खासदारांनी या चौकशीचे आदेश दिले की काय ? अशी चर्चा ऐकावयास मिळत होती.