देगलूर: महाराष्ट्र शासनाने गोर गरीब जनतेला मोफत जेवण मिळावे यासाठी शिवभोजन थाली केंद्रचे स्थापन केली त्यासाठी देगलूर येथे गोर गरीब कष्टकरी शेतकरी हमाल यांच्या साठी देगलूर येथे शिवभोजन थाली केंद्र सुरू करण्यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे देगलूर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांनी मागणी केली असता खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब अन्न व नागरी पुरवठा मंत्री सन्मानिय छगन भुजबळ यांना देगलूर येथे शिवभोजन थाली सुरू करण्यासाठी शिफारस करेन असे पत्र पाठवून विनंती केली याबद्दल देगलूर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांनी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे आभार मानले जर देगलूर येथे शिवभोजन केंद्र चालू झाले तर याचा खूप लोकांना फायदा होईल गोर गरीब कष्टकरी शेतकरी हतबल झालेल्या गोर गरीब जनतेला दिलासा मिळणार आहे त्यासाठी देगलुरात शिवभोजन क्रेंद्र चालू करणे गरजेचे आहे असे शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांनी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना विनंती केली.
