वाटुर जयपूर वझर सरकटे रस्त्यासाठी 25 कोटी रुपये मंजूर…
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे
परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असून गेल्या वर्षभरामध्ये परतुर मंठा विधानसभा मतदारसंघासाठी आपण 500 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला असून, पुरवणी अर्थसंकल्प व नाबार्ड अंतर्गत मतदार संघातील विकासासाठी 31 कोटी 25 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे
पुढे या पत्रकात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे की मतदार संघातील वाटुर जयपूर वझर सरकटे रस्ता अतिशय खराब झाला होता जागोजागी मोठमोठे खड्डे पडले होते ही गोष्ट ध्यानात घेऊन या रस्त्यासाठी आपण प्रयत्नपूर्वक 25 कोटी रुपयांचा निधी पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर करून घेतला असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे
पुढे या पत्रकात म्हटले आहे की रेणुका देवी मंदिरासाठी जाणारा रस्ता हा भाविकांसाठी खऱ्या अर्थाने कसरत ठरत होता याबाबतीत अनेकांनी आपल्याकडे पाठपुरावाही केला होता त्यामुळे या रस्त्याला प्राधान्याने मंजुरी मिळावी यासाठी आपण प्रयत्न केले त्या प्रयत्नांना यश आले असून नाबार्ड अंतर्गत या रस्त्याच्या कामासाठी चार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे तर परतूर तालुक्यातील लोणी खूप ते बानाची वाडी या रस्त्यासाठी 01 कोटी 53 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे
तर मंठा शहरांमध्ये असलेली न्यायालयाने इमारत भव्य दिव्य वास्तू असून या ठिकाणी मात्र माननीय न्यायाधीशांच्या निवासस्थानाची कमतरता होती त्यासाठी 71 लक्ष रुपयाचा निधी आपण प्राप्त केला असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे
कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदार संघासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे पत्रकात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी नमूद केले आहे…
