आज दि.17/07/23 रोजी जि प प्रा शा मष्णेरवाडी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक भरत कोरे यांची बदली झाल्यामुळे निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख शेळके यांच्या हस्ते शाल, पुष्पहार ,श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्ञानोबा नरवटे (अध्यक्ष शा.व्य.स.),प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख राजेश्वर शेळके शीवराज हाके, सत्कारमूर्ती भरत कोरे राजाराम देवकते (उपसरपंच)मंचकराव हाके,खंडू मारकड,किशनराव वडारे(अध्यक्ष नेहरु युवा मंडळ),सुधाकर सलगर तानाजी वागलगावे (मु.अ.शिरनाळ),धमणे उपस्थित होते.विद्यमान मु.अ. दत्तात्रय सोमासे सरांनी प्रास्ताविकात सांगितले की कोरे सरांनी शाळेत प्रथम नेमणूक 1997पासून2023पर्यंत एकूण 26 वर्षे सेवेतील 6 वर्षे वगळता20 वर्षे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उत्कृष्ट कार्य केले आहे.यावेळी सुजित नरवटे,किशनराव वडारे यांनी सांगितले की भरत कोरे सरांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक आणि मु.अ. म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे.कोरे सरांनी विद्यार्थी व ग्रामस्थांचे सहकार्याबद्दल आभार मानले.कार्यक्रमासाठी सहशिक्षक शिवाजी जगताप नंदकुमार शंकरे, विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. उपस्थितांचे प्रदीप फुटाणे यांनी आभार मानले.
