
दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद:- भूम शहरातील रामहरी नगर भागातील एका आठ वर्षीय चिमुकल्याचा सोमवारी दुपारी विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला असून एकावर बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत सविस्तर माहिती अशी की,शहरातील रामहारी नगर येथील बजरंग सांगोळे यांचा आठ वर्षीय मुलगा आयुष हा घराच्या छतावर खेळत असताना त्याचा विजेच्या वायरला अचानक धक्का लागला व त्याचा जागीच मृत्यू झाला, तो मृत्युमुखी पडलेला असतानाच त्याच्या बाजूला खेळत असलेला त्याचा चुलत भाऊ समर्थ दिगंबर सांगोळे हा त्याला काय झाले हे पाहण्यासाठी त्याच्या जवळ गेला मात्र ही बाब शेजारील घराच्या छतावर उभ्या असलेल्या काकासाहेब गाढवे यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ वीज पुरवठा खंडित करून समर्थला एक प्रकारे जीवदान दिले.काकासाहेब गाढवे यांच्या सतर्कतेमुळे एका चिमुरड्याचे प्राण वाचले असून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे, मात्र या दुर्घटनेत ज्या निष्पाप चिमुकल्याचा जीव गेला त्यास सर्वस्वी महावितरण जबाबदार असल्याचे सांगोळे कुटुंबियांचे म्हणणे आहे.कारण महावितरणच्या अधिकृत खांबावरून घरात दिल्या जाणाऱ्या कनेक्शन ला जोडली जाणारी अर्थीग वायर ही नेहमी वाऱ्याच्या झोकात मेन वाहिणीस चिकटत होती त्यामळे छतावर ज्या ठिकाणी सदरील वायर बांधले होते त्या ठिकाणी विद्युत प्रवाह पूर्ण क्षमतेने चालू होता,मात्र याबाबत अनभिज्ञ असलेल्या या चिमुकल्याना याची कल्पना नसल्याने व महावितरणच्या या गलथान कारभारामुळे त्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला तर एकावर उपचार सुरु असून तो मृत्यूशी झुंज देत आहे,या घटनेस जबाबदार असणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून मयत चिमुकल्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत शासनाच्या वतीने मिळावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.