
गोविंद पवार उपसंपादक नांदेड
लोकहित सर्वेत्तपरी या नावाने संबंध महाराष्ट्र आपली पायमुळ रोवलेला व कसल्याच प्रकारचे राजकारण न करता सामाजिक शैक्षणिक क्षेत्रांशी निगडित असलेल्या सर्व मान्यवरांचा , जिजाऊ सावित्रीच्या लेकिंचा सम्मान आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांच्या वतीने दरवर्षी होतो. आझाद ग्रुप राज्यतील राज्यकर्त्यांच्या नाकावर टिच्चून प्रथम कोठेही सहकार्यासाठी समोर असतो हे महाराष्ट्रातील जनतेने डोळ्यांनी अनुभवलेल नसुन प्रत्यक्ष पाहीले आहे .
लोहा तालुक्यातील रिसनगाव येथील एका शेतकऱ्याने सततची नापीकी डोक्यावर कर्जाचा डोंगर व यावेळी पावसाने मारलेली दडी व वर्षभर शेतात काबाडकष्ट करून कमवलेल्या मालाला कवडीमोल भाव या सर्व बाबींचा सामना करत आत्महत्या केली.
आझाद ग्रुपवतीने एक हात मदतीचा म्हणून आ
आत्महत्याग्रस्त शेतकरी मुक्ताजी रामा हाबगुंडे यांच्या परीवाराला आर्थिक मदत करण्यात आली. व सांत्वनपर भेटीमध्ये त्या परीवाराचा सांत्वन करून आझाद ग्रुपवतीने धीर देण्यात आला.
यावेळी आझाद ग्रुपचे तालुकाध्यक्ष रूद्रा पाटील भोस्कर , रिसनगाव सरपंच पिंन्टु पा पवार , विश्वा नावंदे , सागर मंगनाळे, माणिक पाटील पवार , विनय गोडबोले सह आदिंची उपस्थिती होती. राज्यभरात सतत छोटो मोठे उपक्रम घेणाऱ्या आझाद ग्रुप टिमला जिल्हासह राज्यभर शुभेच्छा दिल्या जात आहेत…