दै.चालू वार्ता
प्रतिनिधी उमापूर कृष्णा जाधव
बीड गेवराई उमापूर
उमापूर मधील एक ही रस्त्याचे काम असे नाही की ते पूर्ण झाले, उमापूर मधून माटेगाव,
जळगाव, खळेगाव व इतर वाड्या वस्त्यांना जाणारा हा मेन रस्ता
याची अशी दुरावस्था झाली गुडघ्या इतके मोठे खड्डे पूर्ण सगळीकडे या रस्त्याला पडले असून, यावरून टू व्हीलर नाही तर फोर व्हीलर देखील चालू शकत नाही, अशा बेकार परिस्थितीअशा बेकार परिस्थितीत हा रस्ता एकदम पूर्णपणे खराब झाला असून, या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांना नाहतत्रास सहन करावा लागतोय, येथील नागरिकांना घराबाहेर देखील पडता येत नसल्याने
रस्त्यावर गाळ सासलेला असून या रस्त्यांवर भरपूर प्रमाणात खड्डे पडलेले आहेत,अधिकाऱ्यांनी आपले डोळे बंद केले आहे असे दिसून येते
उमापूर मधून जाणारा सुळेगाव गुळज रस्ता,व याच रस्त्याला चार वस्त्या असून,यांचा कधी विचार होणार,विकास हा नाव उमापूरच्यानशिबातच नाही असे उमापूरच्या नागरिकांना वाटत असून,
या रस्त्यांचे काम कधी होईल,शेतीला जाण्यासाठी पण हा रस्ता खूप उपयोगी असून,उमापूर मधला हा विकास 1992 मधलाच असावाअसे नागरिकांतून सांगण्यात येत आहे,
कारणून पुढे विकास हा नाव कधी उमापूर मध्ये झाल्याच नाही,
असा कोणता रस्ता नाही की ज्यामध्ये गाळ, माती आणि खड्डे साचलेले पाणी नाही,
उमापूर मधून मेन रस्ता फाट्यावरून गावात जाणारा हा रस्तात्याची तर बातच निराली
हा रस्ता तर कधी झालाच नाही आणि होतही नाही,या रस्त्यात फक्त खड्डे आणि खड्डेच असून,यातून कोणालाही चालणे खूप कठीण जाते.
संबंधित अधिकाऱ्यांनीया रस्त्यांचे व्यवस्थित पंचनामे करावे.जसे खळेगाव ग्रामपंचायत चे कारभार चालू आहे.तसेच उमापूर ग्रामपंचायत चे ही कारभार त्याचप्रमाणे चालू आहे.संबंधित अधिकाऱ्यांनी यावर लक्ष देणे गरजेचे असून
या रस्त्यांवर लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावे असे सर्व गावकऱ्यांकडून होत आहे.नसता रस्त्यावर बसण्याची वेळ आणू नये…
