दैनिक चालु वार्ता
कंधार तालुका प्रतिनिधी – माधव गोटमवाड
डॉ.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ५३ वी पुण्यतिथी कंधार येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास जयंती मंडळा तर्फे पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शहरातील अण्णाभाऊ साठे शॉपिंग कॉमप्लेक्स कंधार येथील पुतळ्या समोर ५३ वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.यावेळी मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्ता अशोक गायकवाड म्हणाले की भारत स्वतंत्र चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व साहित्यरत्न लोक शाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी त्यांनी दीड दिवस शाळा शिकून ३५ कादंबऱ्या,१९कथा संग्रह,१४ लोकनाट्य असे लेखन केले. आपला देश स्वतंत्र झाल्या दुसऱ्या दिवशी मोर्चा कडून दलितांच्या गुलामगिरीच्या विरोधात आवाज उठवला आणि
ये आझादी झूठी है देश की जनता भूखी है असा नारा दिला.
यावेळी या कार्यक्रमाला जयंती मंडळाचे अध्यक्ष महेश कांबळे,गंगाधर कांबळे,दयानंद मळगे,निलेश मोरे ,विशाल कांबळे,व्यंकट कांबळे,कैलास कांबळे संभाजी फुले ,रेड पँथर संघटनेचे अध्यक्ष राजू भाऊ मळगे,महेंद्र कांबळे, आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष साईनाथ मळगे,ऑड.सचिन कांबळे, विकास कांबळे, व्यंकटेश फुले,गंगाधर सूर्यवंशी,सरोज मोरे,ऋषीकेश राजकोर,रणधीर कांबळे,चंद्रशेखर कांबळे,दिपक कांबळे,माधव वाघमारे सतीश नावघरे,अरविंद वाघमार आदी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार संतोष कांबळे यांनी मांडले…
