दै.चालु वार्ता
उस्माननगर ( प्रतिनिधी )
लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांची परभणी येथे बदली झाल्याने भावपूर्ण निरोप तर त्याच्या जागेवर पुन्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद मुळे यांची नेमणूक झाल्याबद्दल आणि उस्माननगर प्राथमिक आरोग्य केंद्राला नव्याने वैद्यकीय अधिकारी लोणे यांची नेमणूक झाल्याबद्दल उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे ,माणिक भिसे ,देविदास डांगे ,अमजद खान पठाण, लक्ष्मण कांबळे ,शुभम डांगे ,गौस वाडेवाले , यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
श्री पांडुरंग भारती हे शांत , प्रेमळ, स्वभावाचे अधिकारी म्हणून सर्वांना परिचित होते.उस्माननगर पोलीस ठाण्यातून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या शक्यतो पदोन्नतीवर झाले आहेत . उस्माननगर ता.कंधार येथील पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात आयोजित छोटेखानी एका कार्यक्रमात पुष्पगुच्छ देऊन स्वागत व निरोप समारंभचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्वप्रथम साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री भारती साहेब म्हणाले, उस्माननगर वाशीयांचे यांचे प्रेम विसरणार नाही . एक वर्षाच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. उस्माननगर परिसरातील पत्रकार बांधवांचे प्रेम विसरणार नसल्याचे यावेळी व्यक्त केले.
नव्याने पुन्हा एकदा पदभार स्वीकारलेले श्री सपोनी शिवप्रसाद मुळे यांनी मागील काळातील आठवणींना उजाळा देत सर्व गोष्टीचा उलगडा केला. कायदा व सुव्यवस्था आबादी ठेवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश लोखंडे यांनी तर पत्रकार देवदास डांगे यांनी सर्वांचे आभार मानले…
