होल्ड वर केले जाते शेतकऱ्यांचे अकाउंट..?
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी,उमापूर कृष्णा जाधव
बीड (गेवराई/उमापूर) उमापूरच्या एसबीआय बँक ने एकच धडाका उठवलेला आहे.अनेक शेतकऱ्यांचे अकाउंट होल्ड वर टाकण्यात आले असून, एसबीआय बँकेने शेतकऱ्याची फजिती चालवली आहे.
ही बँक 16 ते 17 खेड्यांची बँक असून या बँकेत महिना महिना चक्रा मारून शेतकऱ्याचे अकाउंट होल्ड वरून काढले जात नसून,
या बँकेकडून शेतकऱ्यांना खूप त्रास दिला जातोय, शासनाचा वेळोवेळी बँकांना सांगूनही शेतकऱ्यांचे अकाउंट होल्ड केले जाते,
आपल्या मनमर्जी कारभारामुळे शेतकरी त्रस्त असून याकडे लक्ष देण्याची गरज भासते,
शेतकऱ्यांचे अकाउंट होल्ड न करण्याचे आदेश दिले असून, वेळोवेळी शासनाने बँकांना सांगूनही
शेतकऱ्यांचे खाते होल्ड केले जातात
यामुळे शेतकऱ्यांना शासनाची पी एम किसान निधी योजना चे पैसे खात्यावर जमा होऊनही याचा शेतकऱ्यांना काहीही उपयोग होत नाही, कारण खाते होल्ड असल्यामुळे बँकेचा व्यवहार करता येत नसून,
शेतकऱ्यांना फक्त बँकेत चक्रा मारण्यास मजबूर केले जाते.
शेतकऱ्यांना अडीअडचणी सुखदुखात शेतीच्या कामासाठी
लागत असलेल्या पैशा साठी
लोकांची आडवणूक केली जाते,
एसबीआय बँकेची मनमर्जी पणाने चालत असलेला कारभार केव्हापासून बंद होईलअसे शेतकरी वर्गातून सांगण्यात येत आहे .
शासनाकडून या बँकांना तातडीने
शेतकऱ्यांचे अकाउंट होल्ड वरून काढण्यात यावे यासाठीशेतकरी वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे.
लवकरात लवकर शेतकऱ्यांचे अकाउंट ओल्ड वरून काढण्यात यावे असे आदेश या बँकांना देण्यात यावे
असे उमापूर व उमापूर परिसरातील नागरिकांनी सांगण्यात येत आहे.
अचानक शेतकऱ्यांना जर काही पैशांची गरज भासलीतर बँकात पैसे असूनही शेतकऱ्यांना याचा उपयोग होत नसल्यामुळे शेतकरी वर्ग त्रासलेला असून,माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी (एसबीआय) बँकांना तातडीने आदेश देण्यात यावे अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.
