प्रशासनाने मोडले शेतातील उभे पिक…
श्री बिल्वेश्वर संस्थान सातेगाव यांच्या ताब्यात प्रशासनाने दिले शेत जमीन…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भोकरी शेत शिवारातील शेत गट नंबर २१ क्षेत्र ३७ एकर शेत जमिनीवर प्रशासनाने आज दिनांक २० जुलै २०२३ रोजी पोलीस बंदोबस्तात ताबा केला आहे.
माहिती प्राप्तीनुसार प्रशासक रवींद्र गुल्हाने यांनी पोलीस प्रशासन संरक्षणासह श्री बिल्वेश्वर संस्थान सातेगाव यांचे प्राप्त अर्जानुसार मौजा भोकरी येथील शेत गट नंबर २१ क्षेत्र ३७ एकर शेत जमिनीचा ताबा गावंडे यांच्या ताब्यातील शासकीय हऱ्हाशीनुसार श्री बिल्वेश्वर संस्थान सातेगाव यांच्या ताब्यात देण्यात आले.
सदर प्रकरणी हाय कोर्टाच्या निर्देशानुसार गावंडे यांनी वारस ताबा पत्र संबंधित कार्यालयाला देणे अपेक्षीत होते परंतु त्यांनी वारस पत्र किंवा ताबा असल्याबाबत प्रमाणपत्र दिले नसल्यामुळे प्रशासनाला मिळालेल्या पत्रानुसार पोलीस संरक्षणात शेतातील उभे कपाशीचे पिक ट्रॅक्टर द्वारे उध्वस्त करण्यात आले आणि नंतर श्री बिल्वेश्वर संस्थान सातेगाव यांच्या ताब्यात देण्यात आहे असे प्रशासक रवींद्र गुल्हाणे यांनी म्हटले.
आजपर्यंत ताबा असलेल्या (पेरलेल्या) शेतातील शेतकऱ्याने प्रशासनाला धाक दाखवण्याचा प्रयत्न केला आणि पोलीसांनी तो हाणून पाडला असून सदर शेत रहिमापुर पोलीस संरक्षणात श्री बिल्वेश्वर संस्थान सातेगाव यांच्या ताब्यात देण्यात आहे.
