मतदारसंघातील सर्व वारकरी, साधुसंत, माता भगिनींनी या किर्तन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे शेकापचे आवाहन…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या सुविद्य पत्नी तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त लोहा कंधार मतदार संघात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, दि. 20 जुलै गुरुवारी शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या नांदेड येथील निवासस्थाना वरून आशाताई शिंदे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सकाळी ,०७;३० वाजता पासून नांदेड शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून नंतर कंधार व लोहा तालुक्यातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून लोहा शहराजवळील पार्डी येथील विकी गार्डन येथे सर्व वारकरी, साधुसंतांचा येथोचित सन्मान आमदार श्यामसुंदर शिंदे कुटुंबीयांच्या हस्ते होणार आहे. विकी गार्डन येथे आशाताई शिंदे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार कीर्तन केसरी ह. भ. प. अक्रूर महाराज साखरे बीड यांचे कीर्तन होणार आहे ,तरी लोहा कंधार मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यातील सर्व वारकरी, साधुसंत व माता बहिणी व नागरिकांनी शेकापच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा सौ. आशाताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम व कीर्तन कार्यक्रमा सह विविध धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन शेकापचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील शिंदे हरबळकर, शेकापचे नांदेड जिल्हा अध्यक्ष बालाजी ईसादकर, शेकापचे जिल्हा सचिव हनुमंत पाटील जाधव डोणवाडेकर यांनी केले आहे.
