नागरिकांना भ्रष्टाचाराचा संशय…
दै.चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा/सुरेश ज्ञा. दवणे…
जालना मंठा…ग्रामपंचायत आणि भ्रष्टाचार हे समीकरण नागरिकांना नवीन नाही. विविध विकास कामासाठी शासनाचा आलेला निधी विकास कामांमध्ये न लागता ग्रामपंचायने खाऊन ढेकर दिल्याच्या अनेक घटना नेहमीच घडत असतात. मात्र केहाळ वडगाव येथील ग्रामपंचायत सरपंच व काही सदस्यांनी मागील झालेल्या अंगणवाडी दुरुती,हँडवॉश बेसिन, कचरा कुंडी गायब, शाळेची लाईट फिटिंग इत्यादी कामे दर्जाहीन केली आहे याची सीमा पार करत एक विद्युतपंप,पिव्हीसी पाईप दोन खड्डे खोदण्यासाठी तब्बल एक लाख ८०हजार रुपयाचा खर्च केल्याने केहाळ वडगाव ग्रामपंचायत ची चर्चा संपूर्ण मंठा तालुक्यात होत आहे. केहाळ वडगाव येथे पंधराव्या वित्त आयोगातून गावात पाणि पुरवठा दुरुस्तीच्या नावाखाली एक विद्युत मोटारपंप, पिव्हिसी पाईप दोन खड्डे खोदून लिकीज काढण्यासाठी अंदाजे एक लाख ८०हजार रुपये खर्च हा सरपंचांनी दाखविला आणि दियेक उचलून हडप केल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.त्यामुळं गावात खळबळ उडाली.एक विद्युत मोटार पंप लिकीज असलेल्या ठिकाणी खड्डे खोदने पाईपसाठी आजच्या बाजारभावाने अंदाजे ऐंशी हजार रुपये खर्च व्हायला हवा होता. मात्र लालची प्रवृत्तीमुळे या कामात सरपंच,आणि काही सदस्यांनी अपहार करत अंदाजे एक लाख रुपये गटकवले. असे पाहता गावात पाणि पुरवठा दुरुस्तीची गतवर्षी झाली त्याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष असल्यामुळे गावात पाणि सुटत नसल्यामुळे पाणि पुरवठा दुरुस्ती म्हणजे व्यर्थ खर्च असल्याचे गावातील जाणकार व्यक्तींचे मत आहे कारण शासनचा हेतू असतो की जनतेला सुखसुविधा मिळाव्यात नागरिकांच्या भल्यासाठी योजना निधी वितरित करत असते परंतू गावपुढारी पूर्ण निधीचाच गैरवापर करून खिसा गरम करत असल्याचे चित्र दिसत आहे तरी या कामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
