
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर:मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेचा आज इंदापूर तालुका काँग्रेसच्या वतीने निषेध करून नायब तहसीलदार ठोंबरे यांना निवेदन देण्यात आले. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
इतकी मोठी घटना घडत असताना देशाच्या पंतप्रधान गप्प आहेत. आदिवासी समाजाच्या राष्ट्रपती आहेत. त्यांच्याकडून आदिवासींचे संरक्षण होण्याची अपेक्षा होती मात्र त्यांच्याकडून अपेक्षा भंग झाला असे काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदारांची भेट घेतली. अमानवी कृत्य करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी इंदापूर तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे .
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, कार्याध्यक्ष तानाजी भोंग, प्रदेश सचिव काकासाहेब देवकर, महादेव लोंढे, जाकीर काझी, युवराज गायकवाड, शिवाजी आहेर, नितीन राऊत,अरूण राऊत, रहिमान मुलाणी, नागनाथ भडंलकर,नशीरभाई शेख आदी मान्यवर व काॅंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.