दर्गाह साठी २५ लक्ष रुपये व मारुती मंदिर सभामंडपासाठी १० लक्ष रुपयांचा धनादेश ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मा.जि.प. उपाध्यक्ष धनंजय सावंत,मा.नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते सुपुर्द…
दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
भु म:- महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून मौ.माणकेश्वर येथे होत असलेल्या जलजीवन,काँक्रीट रस्ते यासह अन्य मूलभूत नागरी सुविधा विकास कामांचा उदघाटन सोहळा संपन्न झाला.यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत,मा.नगराध्यक्ष संजय गाढवे सर्व शिवसेना पदाधिकारी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उदघाटन करून येथील दर्गाह साठी २५ लक्ष रुपये व मारुती मंदिर सभामंडपासाठी १० लक्ष रुपयांचा धनादेश ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सुपुर्द करण्यात आला.यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गौतम लटके,तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ,मा.जि.प.सभापती दत्ता मोहिते,कृ. उ.बा.स.सभापती निलेश शेळवणे,संचालक विशाल अंधारे,संचालक विशाल ढगे,उद्योजक मनोज अंधारे,कृषी अधिकारी किशोर अंधारे,वारेवडगावचे सरपंच दत्ता नलवडे,बाळू सुर्वे,पत्रकार अब्बास सय्यद यांच्यासह सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
