
ग्रामस्थांची तहसीलदारांकडे तक्रार…!
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी मंठा सुरेश ज्ञा. दवणे
मंठा तालुक्यातील वाघाळा – टाकळखोपा येथील शेतकरी व ग्रामस्थांनी पुर्णा पाञातुन वाघाळा-टाकळखोपा व इचा रस्त्याने नदीपाञातुन अवैध वाळू उत्खनन करून वाहतुक होत असल्याने या रस्त्याची फार दुरावस्था झाली असल्याने या रस्त्यावरील अवैध वाळू वाहतूक बंद करून कारवाई करण्याची मागणी एका निवेदनादृवारे तहसीलदार रूपा चिञक यांच्याकडे केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि पूर्णा पाटी ते वाघाळा – टाकळखोपा – इंचा या रस्त्याने नदीपत्रातून अवैध वाळू उत्खनन होत असल्यामुळे सदरील गावांच्या रस्त्याची दूरअवस्था होत असून शाळेतील विद्यार्थी व शेतकरी व गावकरी, नागरीक यांना जाण्यायेण्या करिता खूप त्रास होत आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यायेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.
तरी सदरील होणारी अवैध वाळू वाहतूक उत्खनन थांबवावे अवैध वाळू वाहतूक उत्खनन करणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.अशी मागणी दिलेल्या निवेदनात गावकऱ्यांच्या वतिने करण्यात आली आहे.या निवेदनावर प्रदिप किसनराव चाटे, अंकुश देवराव घुले, केदारनाथ विठोबा कांगणे, गजानन भिकाजी कांगणे,राम आसाराम चाटे सह आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.