
दै.चालु वार्ता नांदेड
प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड जिल्हा शिवसेनाप्रमुख माननीय आनंद बोंढारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले त्याच अनुषंगाने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार संचलित श्री शिवाजी प्राथमिक शाळा कौठा नवीन वसाहत नांदेड या शाळेत वर्ग पहिली ते चौथीच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना व गरजू विद्यार्थ्यांना या तिन्हीही कार्यक्रमाचे औचित्य साधून नांदेड शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय आनंद बोंडारकर यांच्या शुभ हस्ते शालेय दप्तराचे वाटप करण्यात आले. . साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती , लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पुण्यस्मरण व नांदेड शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय आनंदराव बोंडारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अर्थातच या त्रिसूत्री कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आनंदराव बोंढारकर शिवसेना जिल्हाप्रमुख हे होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजी , प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शालेय समिती सदस्य श्री मधुकरराव कुरुडे तसेच श्री शिवाजी प्राथमिक शाळा कौठा , नवीन वसाहत नांदेडचे मुख्याध्यापक एन.व्ही.गवळे , ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.शिंदे एम.एन. कौठा ज्युनिअर कॉलेज इन्चार्ज प्रा.सय्यद जमील , ज्युनिअर कॉलेजचे कौठा शाखेतील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.ज्ञानेश्वर विठ्ठलराव लुंगारे , माध्यमिक विद्यालयाचे कौठा इन्चार्ज श्री टिमकीकर बी. एम. तसेच प्राथमिक शाळेचे सहशिक्षक श्री स्वामी सर व श्री विश्वासराव सर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि हा नांदेड शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय आनंदराव बोंडारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम अतिशय उत्साहात व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारा व गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करणारा ठरला शिवसेना जिल्हाप्रमुखासह यांच्या समवेत अनेक शिवसैनिक या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुखाचे सर्वत्र अभिनंदन करून कौतुक केले जात आहे.