
दै.चालु वार्ता
प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा फुले प्राथमिक शाळा बाबा नगर , विजयनगर नांदेड च्या सहशिक्षिका श्रीमती विद्यावती शिवानंद स्वामी या नियत वयोमानानुसार तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 जुलै 2023 रोजी सेवानिवृत्त होत असून यांच्या सेवानिवृत्ती समारोह सोहळा शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे संस्था सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय श्री डी.पी. सावंत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात नांदेड जिल्ह्याचे भाग्यविधाते श्रद्धेय शंकररावजी चव्हाण साहेब व कुसुमताई शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या प्रतिमांची पुष्प पूजा करून झाली. .सेवानिवृत्तीच्या निरोप समारोह सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव मा.अँड उदय रावजी निंबाळकर साहेब तसेच कोषाध्यक्ष मा. डॉ. रावसाहेब शेंदारकर साहेब कार्यकारणी सदस्य मा. श्री नरेंद्रजी चव्हाण साहेब व दुसरे कार्यकारणी सदस्य मा. श्री पांडुरंगरावजी पावडे साहेब इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत थाटामाटात व भावुक प्रसंगात संपन्न झाला. . याप्रसंगी सौ विद्या स्वामी यांच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेतलेल्या सध्या चौथ्या वर्गात शिकत असलेल्या स्वजल जयवंत यानभुरे या एका विद्यार्थिनीने प्राथमिक स्वरूपामध्ये अतिशय सुंदर व भावनिक मनोगत व्यक्त केले याप्रसंगी महाराष्ट्राचे माजी मंत्री व शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव माननीय डी पी सावंत साहेब तसेच कार्यकारणी सदस्य नरेंद्र चव्हाण व स्टेज वरील सर्वच मान्यवर अक्षरशः या लहान चिमुकलीचे मनोगत ऐकून अवाकच झाले व सुजल यानभुरे या चिमुकलीचे शाळेचे मुख्याध्यापकासह सर्वच शिक्षकांनी व शिक्षिकेंनी अभिनंदन करून तोंड भरून कौतुक केले. संस्थेचे सचिव माननीय डी पी सावंत साहेब यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व विद्या स्वामी यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा तर दिल्याच परंतु शुभेच्छा देत असताना एखाद्या शाळेची शिक्षिका कशी असावी आणि तिच्या हातून विद्यार्थी कसे घडावेत याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे त्या शिक्षिकेच्या हाताखाली पहिल्या वर्गात शिकलेली व सध्या चौथीत असलेली ही स्वजल यानभुरे हि होय , तिच्या अंगी असलेले धैर्य एकूणच तिची बुद्धिमत्ता व स्टेज करेज विषयातील परिपूर्ण ज्ञान या सर्व गोष्टी मॅडमने तिच्या अंगी रुजवण्याचा जो प्रयत्न केला तो आज प्रतीक्षात पाहायला मिळाला याचे आज मला आत्मिक समाधान होत आहे असे गौरवोद्गार संस्थेचे सचिव माननीय डी.पी. सावंत साहेब यांनी काढले व सौ. विद्या स्वामी यांना सेवानिवृत्तीच्या भरभरून शुभेच्छा देऊन सदैव समृद्ध व आपण आरोग्यधिष्टीत रहावे अशी कामना व्यक्त केली प्रसंगी माननीय डी.पी. सावंत साहेबांनी त्यांना राजकीय दरवाजे सुद्धा खुले असल्याचे सर्वांच्या समोर स्पष्ट केले कारण राजकारणात अभ्यासू तज्ञ व्यक्तींची अर्थातच स्त्रियांची खूप गरज आहे अशी भावनाही व्यक्त केली कारण दोन दिवसांपूर्वी मनोहर कुलकर्णी अर्थातच संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संदर्भात जे अपमानास्पद विधान केले आहे याचा निषेधही त्यांनी व्यक्त केला. . या सेवानिवृत्ती सोहळ्याप्रसंगी शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेडच्या विविध शाखातील आजी-माजी मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच अंबिका विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यालयात त्या काळात शिकून गेलेले विद्यार्थी व सध्या चे सर्व पालक व विद्यार्थी आणि सौ विद्या स्वामी यांची सर्व नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम न भूतो न भविष्यती असा पार पडला अतिशय सुंदर अशा या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महात्मा फुले प्राथमिक शाळा बाबा नगर नांदेड चे वर्ग चौथी वर्ग शिक्षक श्री उमाकांत निरणे सर यानी केले आणि कार्यक्रमाची सांगता स्वरूचि भोजनाने झाली.