
दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
यादव नवनाथ
भु म:-शहरात साठे नगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ वी जयंती निमित्त जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मा.नगराध्यक्ष संजय गाढवे व जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ.संयोगीताताई गाढवे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.तसेच संजय गाढवे यांच्या हस्ते लक्ष्मी नगर,कसबा येथे प्रतिमा पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी,सुरज गाढवे,मा.नगराध्यक्ष संजय शिंदे,मा.नगरसेविका मेहेराजबेगम सय्यद,एल टी शिंदे,सुनील थोरात,कांतीलिंग थोरात,तुकाराम माळी,राम बागडे,पै.अमोल भोसले,भारत साठे,आण्णा साठे,दत्ता साठे,प्रा.दत्ता गायकवाड,प्रा.अमोल साठे,किरण साठे,सुनील साठे,वैभव गायकवाड,नितीन साठे,पत्रकार अब्बास सय्यद,वसीम काजळेकर,प्रल्हाद आडागळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते.