
गोविंद पवार उपसंपादक नांदेड
जनता माझी मी जनतेचा हे ब्रिद वाक्य घेऊन लोकांच्या कल्याणासाठी रात्र-दिन कार्य करणारे लोककल्याणकारी लोकनेते खा. प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब असुन आज त्यांचा वाढदिवस असुन वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा.
खा. प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांना मन्याडचा वाघ म्हणुन ओळखले जाते . कंधार तालुक्यातील मौजे चिखलीचे भूमीपुत्र असलेले खा. प्रतापराव पाटील चिखलीकर हे लोकात मिळसणारे लोकांच्या सुख दुःखात सहभागी होणारे लोकनेते असुन त्यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात चिखली या गावच्या सरपंच पदापासून केली व आज ते दिल्ली येथे असणारे देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या भारतीय संसदेचे सदस्य आहेत.
खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांना त्यांचे वडील शांतीदूत कै. गोविंदराव पाटील चिखलीकर यांचा राजकिय वारसा आहे.
त्यांचे वडील कै. गोविंदराव पाटील चिखलीकर हे देशाचे माजी गृहमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण साहेब यांचे विश्वासू व एकनिष्ठ कार्यकर्ते होते खा. चिखलीकर साहेब ओळखले जायाचे कै. शंकरराव चव्हाण साहेबांनी चिखलीकर साहेबांला जि.प. चे सर्व विभागाचे सभापती पद दिले. तसेच खा. चिखलीकर साहेब हे एकेकाळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांचे विश्वासू सहकारी होते. अशोकराव चव्हाण साहेब हे त्यावेळी परिवहन मंत्री झाल्यानंतर चिखलीकर साहेबांनी नांदेड येथे नवा मोंढा मैदानात त्यांचा फार मोठा सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता.
खा. चिखलीकर साहेबांना कंधार विधानसभेची निवडणूक काँग्रेस पक्षाच्या वतीने लढविण्याची इच्छा होती पण त्यांना दरवेळेस हुलकावणी बसत होती.
पुढे चालून २००४ कंधार विधानसभेसाठी खा. चिखलीकर साहेब त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक होते व कंधार विधानसभा काँगेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत काँगेस ही जागा सुटणार होती पंरतू माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर (दादा) यांच्यामुळे ही जागा काँग्रेसला सुटली नाही कारण माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर (दादा) यांनी बिलोली मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेस ला आलेला काँग्रेसला सोडा व कंधार मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडा म्हणून आग्रह धरुन तो सोडवून घेतला व कंधार मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला व त्यामुळे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सोबत सर्व कार्यकर्ते नाराज झाले होते व यावेळी चिखलीकर साहेबांसहीत सर्वानी नारा दिला ‘ अभी नही तो कभी नही ‘ त्यावेळी लोहा न.पा. कंधार,न.पा. सहीत अनेक संस्था या काँग्रेस पक्षाच्या ताब्यात होत्या व काँग्रेसचे सर्व पदाधिकारी हे खा. चिखलीकर साहेबांना सोबत होते.
२००४ ला खा. चिखलीकर साहेब हे कंधार विधानसभेच्या निवडणुकीसाठी साम, दामासहीत उतरले व ते या निवडणुकीत दणदणीत मतांनी विजयी झाले.
पुढे चालून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. विलासराव देशमुख साहेब झाले व दुधात साखर पडल्या सारखे झाले. अपक्ष आमदार म्हणून तात्कालीन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांनी तात्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला व ते तात्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांचे अत्यंत विश्वासू जवळचे आमदार म्हणून ओळखले जाऊ लागले. तात्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी कंधार -लोहा मतदार संघात विकासाची गंगा आणली लिंबोटी धरणांच्या कामासाठी एकाचवेळी ५०० कोटी रुपयांचा निधी आणून लिंबोटी धरणांचे काम पूर्ण केले त्यामुळे लोहा -कंधार तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन ही ओलिताखाली आली शेतकरी वर्ग खूश झाला.
तसेच तात्कालीन आमदार म्हणून चिखलीकर साहेबांशी अनेक गावात रस्ते, सभागृह केले.
तसेच यात अत्यंत महत्त्वाचे म्हणजे तात्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा व कंधार तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर गोरगरिब नागरिकांना त्यांच्या मुला – मुलीचे लग्न करण्यास आर्थिक अडचणी निर्माण होतात म्हणून त्यांनी लोहा येथे त्यांनी सामुदायिक विवाह सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यात शेकडो मुला – मुलीचे लग्न लावून हजारो जणांना स्वादिष्ट जेवणाची मेजवानी दिली.
जनता माझी मी जनतेचा हे ब्रिद वाक्य घेऊन त्यांनी अनेक लोककल्याणकारी कामे केली .
२००९ साली विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्यावेळी तात्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या सहित सर्व विरोधक एक झाले व त्यावेळी तात्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर अण्णा धोंडगे यांनी यांनी त्यांचा थोड्या मतांनी पराभव केला. तरी या पराभवाला न खचता त्यांनी आपले कार्य सुरुच ठेवले पुढे चालून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत गेले . उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी लोहा न.पा. निवडणूकीची जबाबदारी खा. चिखलीकर साहेबांना दिली व चिखलीकर साहेबांनी लोहा न.पा.त राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोहा न.पा.च्या निवडणूक त्यांच्या कार्यकत्यांनी लढवली पण लोहा न.पा. च्या निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही हा एक त्यांना फार मोठा धक्का बसला तरी ते डगमगले नाहीत त्यांनी धीर सोडला नाही त्यांनी ग्रामीण भागातील सर्व कार्यकत्यांची जमवाजमवी करून पुढे चालून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला पुढे चालून नांदेड जि.प. व लोहा पं.स.च्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले लोहा पंचायत समितीत शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले , त्यानंतर त्यांनी लोहा विधानसभेची निवडणुक त्यांनी शिवसेनेच्या वतीने लढविली व राष्ट्रवादी काँग्रेसचे तात्कालीन आमदार शंकर अण्णा धोंडगे यांचे डिपाझीट जप्त केले तर त्यावेळी भाजपच्या वतीने मुक्तेश्वर धोंडगे यांनी निवडणूक लढविली होती व त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुक्तेश्वर धोंडगे यांच्या प्रचारार्थ अतिविराट सभा घेतली पण त्या सभेचे रुपांतर मतदानात झाले नाही व पुन्हा लोहा – कंधार मतदार संघाच्या जनतेने पुन्हा प्रतापराव पाटील चिखलीकर यांना स्विकारले या काळात त्यांनी लोहा -कंधार मतदार संघात भरपूर विकास कामे केली त्यात लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयाला जागा उपलब्ध करून दिली व आज मोठ्या थाटात हा उपजिल्हा रुग्णालयाल चालू आहे पुढे चालून तात्कालीन आमदार चिखलीकर साहेब हे तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधुन त्यांना पाठिंबा देत पुढे ते भाजपाचे मध्ये त्यांनी प्रवेश केला.
खा. चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपानी लोहा न.पा.ची निवडणूक लढविली व यात भाजपाने नगराध्यक्ष पदासहीत १७ पैकी १३ जागा जिंकून घवघवीत यश मिळविले याबद्दल तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खा. चिखलीकर साहेबांच्या कामगिरीवर खूश होऊन त्यांचे आमदार पदावरून प्रमोशन करीत त्यांना २०१९ ला नांदेड लोकसभेची भाजपाच्या वतीने उमेदवारी दिली व त्यांनी बलाढ्य उमेदवार राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांचा पराभव केला व ते भारतीय संसदेचे सदस्य झाले व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे दुसऱ्यांदा आपल्या भारत देशाचे पंतप्रधान झाले .
पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग आणले राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट रस्त्याचे कामे उत्कृष्ट होत आहेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचा मावेजा मोठ्या प्रमाणात मिळाला .
‘ घार उडे आकाशी तिचे चित पिल्यापाशी ” याप्रमाणे खा. चिखलीकर साहेब हे नांदेड मतदार संघाचे खासदार झाले असले तरी नांदेड लोकसभा मतदारसंघाचा विकास करीतच त्यांचे लक्ष लोहा -कंधार मतदार संघाकडे आहे त्यांनी लोहा -कंधार मतदार संघाच्या विकासासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी आणला येथील जनतेच्या सुख दुःखात ते नेहमी सहभागी होतात असे लोककल्याणकारी लोकनेते खा. प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचा आज वाढदिवस असुन वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा ईश्वर त्यांना चांगले निरोगी व दिर्घ आयुष्य देवो त्यांच्या हातून नियमित जनसेवा घडो व पुढे चालून ते केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होवो हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा.
विलास सावळे
पत्रकार लोहा..