
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर तालुक्यातील येरगी येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आज साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची 103 वी जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सरपंच संतोष पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यानंतर सरपंच तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या विविध साहित्य लेखनाबद्दल माहिती सांगितली. त्यांचे साहित्य हे जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणारे आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य गजानन सुर्यवंशी, पुंडलीक वाघमारे, विश्वनाथ बागेवार,सुरेश सोमावार, तंटामुक्त अध्यक्ष गगांधर बरसमवार, माजी. तंटामुक्त अध्यक्ष मल्लिकार्जुन भोकसखेडे, वैजनाथ पाटील कालिंगवार, हणमंत सोमावार, प्रभाकर पाटील काळीमवार, मनोहर कुंचगे, गजानन भोकसखेडे, केरबा कांबळे, शेषराव भुरळे, रमेश गटावार, मारोती बरसमवार, रामलु तोटावार, गजानन चेंडके, हणमंत भोकसखेडे, अंतेश्वर बागेवार, हणमंत गादगे, शामराव बागेवार, सोनु बागेवार, योगेश बरसमवार, माधवराव बागेवार, मारोती वाघमारे, साधु इज्जरवार, आदी गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.